दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२१ चा ४६ वा सामना झाला. दिल्ली संघाचा कर्णधार रिषभ पंतने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत मुंबईला १२९ धावांत रोखले. यादरम्यान वेगवान गोलंदाज आवेश खानने रोहित शर्माला स्वस्तात बाद केले.
रोहित पुन्हा एकदा आपला आवडता पुल शॉट खेळून बाद झाला, जे खूप आश्चर्यकारक होते. रोहितने १० चेंडूत ७ धावा केल्या आणि आवेश खानच्या शॉर्ट बॉलवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात त्याने चेंडू हवेत मारला आणि थर्ड मॅनवर उभ्या असलेल्या कागिसो रबाडाला सोपा झेल घेतला.
रोहित शर्मा त्याचा आवडता पुल शॉट खेळून बाद होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधी इंग्लंड दौऱ्यावरही तो पुल शॉट खेळल्यानंतर अनेक वेळा बाद झाला होता आणि त्यामुळे त्याच्यावर खूप टीकाही झाली होती. सातत्याने पुल शॉट खेळल्यानंतर रोहितचे बाद होणे हा देखील भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्याचबरोबर इतर गोलंदाज रोहितची ही ताकद त्याची उणीव बनवत चालले आहेत.
जर आपण रोहितच्या बाद होण्याच्या आकडेवारीबद्दल बोललो तर चालू वर्षात तो पुल शॉट खेळताना एकूण ९ वेळा बाद झाला आहे. अशा परिस्थितीत, आता रोहितला विचार करावा लागेल की, त्याला हा शॉट कधी खेळावा लागेल आणि कधी नाही.
In all Forms of cricket this year,
Rohit Sharma has been dismissed nine times playing the PULL SHOT against pace bowling..😔😕 pic.twitter.com/iQa1BcjaAe— Irfan Yazdani (@wtfirfu) October 2, 2021
तत्पूर्वी, दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. मुंबईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करू दिली नाही. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईला दिल्ली संघाने अवघ्या १२९ धावांत रोखण्यात यश मिळवले.
मुंबईने दिलेलं १३० धावांचं लक्ष्य दिल्लीच्या फलंदाजांनी चार गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केलं. दिल्लीकडून या सामन्यात श्रेयस अय्यरने चिवट फलंदाजी करत निर्णायक ३३ धावांची खेळी केली. त्याला आधी रिषभ पंतने २६ धावा करुन आणि रवीचंद्रन अश्विनने २० धावा करुन चांगली साथ दिली.
मुंबई इंडियन्ससाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. कारण त्यांनी त्यांच्या ११ सामन्यांपैकी फक्त पाच सामने जिंकले होते आणि ते अजून प्लेऑफसाठी पात्र ठरलेले नव्हते. या पराभवानंतर त्यांचे प्लेऑफसाठी जाणे अवगढ झाले आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. या विजयासह त्यांनी पहिल्या दोनमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
यशस्वी जयस्वालचे तुफानी फलंदाजी! १९ चेंडूत अर्धशतक करत ‘त्या’ खास यादीत मिळवले दुसरे स्थान
चेन्नईच्या २४ वर्षीय ऋतुराजने लगावले विक्रमी शतक; रैना, विजयला पछाडले