जगातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये दक्षिण आफ्रिकेतील अनेक खेळाडूंच्या नावाचा समावेश होतो. त्या खेळाडूंमध्ये एबी डिविलियर्स याच्या नावाचाही समावेश आहे. डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता 5 वर्षे लोटली आहेत, पण तरीही आजही त्याचे असे काही विक्रम आहेत, जे कुणीच मोडू शकले नाहीये. मात्र, एक असा कारनामा होता, जो डिविलियर्स त्याच्या कारकीर्दीत पूर्ण करू शकला नाही. विशेष म्हणजे, शनिवारी (दि. 17 फेब्रुवारी) डिविलियर्स त्याचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याच्या अपुऱ्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया…
एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने दक्षिण आफ्रिकेडून 144 कसोटीत 50.66च्या सरासरीने 8765, वनडेत 228 सामन्यात 53.5च्या सरासरीने 9577, तर टी20मध्ये 78 सामन्यात 26.12च्या सरासरीने 1672 धावा केल्या आहेत. त्याने 228 वनडेत 25 शतके आणि 53 अर्धशतके केली आहेत.
डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून साधारण 5 वर्षांपूर्वीच म्हणजे 2018 साली निवृत्ती घेतली होती, पण तो जगभरातील विविध लीगमध्ये खेळत होता. मात्र, 19 नोव्हेंबर, 2021 रोजी तो सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला. दरम्यान, अनेकदा त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबद्दल चर्चा झाल्या. पण, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2018 नंतर परतला नाही. त्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये 10000 धावा पूर्ण करण्याची त्याला संधी मिळालीच नाही.
या खेळाडूला वनडेत 10000 धावा करण्यासाठी केवळ 423 धावांची गरज होती. त्याने 228 वनडेत 25 शतके आणि 53अर्धशतके केली आहेत.
वनडेत आजपर्यंत 14 खेळाडूंनी 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्यात दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस हा एकमेव खेळाडू आहे. त्यामुळे, जर डिविलियर्सने आणखी 423 धावा केल्या असत्या, तर वनडेत 10 हजार धावा करणारा तो दुसरा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू ठरला असता. (ab de villiars didnt even wait to complete his 10000 runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मला ‘सर’ म्हणत नका जाऊ! स्वतः जडेजाने केली विनंती
शंभराव्या कसोटीआधी पुजाराचे मोठे वक्तव्य, म्हणाला, “हे माझे स्वप्न नव्हे…”