fbpx
Sunday, January 17, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘मिस्टर ३६०’ एबी डिलिवियर्सने केली आयपीएलच्या तयारीला सुरुवात; पहा व्हिडिओ

September 1, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Screengrab: Twitter/RCBTweets

Screengrab: Twitter/RCBTweets


मुंबई । आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने लीग सुरू होण्यापूर्वी, आपल्या साथीदारांसह सराव सत्रात आनंद लुटला.

डिव्हिलियर्स 22 ऑगस्ट रोजी डेल स्टेन आणि ख्रिस मॉरिस या सर्वांसोबत युएईमध्ये आला. तो सहा दिवस क्वारंटाईनमध्ये राहिला. कोविड -19 तपासाणीत त्याचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील त्याच्या साथीदारांसह प्री-सीझन शिबिरासाठी मैदानात परतला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याचे खेळाडू मैदानावर सराव करत आहेत.  डिव्हिलियर्स पाच महिन्यांनंतर सरावासाठी दाखल झाला आहे.

Picking up from right where they left off months ago, our stars had no problems getting back into the groove as they sweated it out on Day 2️⃣ of the pre-season camp! 💪🏻#PlayBold #IPL2020 #WeAreChallengers pic.twitter.com/gMWImIGLJf

— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) August 31, 2020

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ व्यवस्थापक म्हणाले, ‘क्रिकेटच्या सरावाला पुन्हा एकदा आम्ही सुरुवात करत आहोत. आमच्या स्टार खेळाडूंना लयीत येण्यास काहीच अडचण झाली नाही. कारण प्री-हंगाम शिबिराच्या दुसर्‍या दिवशी त्यांनी जोरदार सराव केला.”

डिव्हिलियर्स म्हणाला, ‘खूप छान झाले. सरावादरम्यान खूपच आनंद घेतला. खेळपट्टी थोडी अवघड होती, म्हणून हे एक मोठे आव्हान होते. बर्‍याच दिवसांनंतर मला अशाच प्रकारे पहिले नेट सत्र हवे होते. मी माझ्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिले आणि बॉलवर मी पूर्ण लक्ष ठेवले. मी काही चांगले शॉट्स खेळले आणि त्याचा आनंद घेतला.’

पहिल्या नेट सत्रात कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन, फिरकीपटू युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम उपस्थित होते. आयपीएलचा 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 10 नोव्हेंबरपर्यंत चालेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अद्याप आयपीएल करंडक जिंकला नाही, परंतु तीन वेळा उपविजेतेपद मिळवले आहे.


Previous Post

सुरेश रैना आयपीएलमधून बाहेर गेला तरी चेन्नई सुपर किंग्सवर परिणाम होणार नाही, पहा कोण म्हणतंय

Next Post

भल्याभल्या गोलंदाजांना धूळ चारणाऱ्या रोहितची फलंदाजी ‘या’ ४ गोलंदाजांपुढे पडते फिकी

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@MumbaiCityFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२० : चुरशीच्या लढतीत मुंबई-हैदराबाद गोलशून्य बरोबरी

January 17, 2021
टॉप बातम्या

अबब! भारताने एकाच मालिकेत खेळवले तब्बल ‘इतके’ खेळाडू

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी मिसबाह-उल-हकने मांडले मत , म्हणाला आमचा संघ ‘या’ गोष्टीचा घेईल फायदा

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरचे ‘या’ ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने केले कौतुक, म्हणाले…

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला भोवल्या ‘या’ दोन चुका

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

रोहितच्या विकेटचे सोशल मिडीयावर उमटले पडसाद, ट्विटरवर ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया

January 16, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ mipaltan

भल्याभल्या गोलंदाजांना धूळ चारणाऱ्या रोहितची फलंदाजी 'या' ४ गोलंदाजांपुढे पडते फिकी

Photo Courtesy: Twitter/ Lionsdenkxip

किंग्स इलेव्हन पंजाबसाठी आनंदाची बातमी; हा गोलंदाज गाजवतोय सीपीएल

Photo Courtesy: Twitter/ICC

शोएब अख्तरची 'या' खेळाडूवर कडाडून टीका; म्हणाला, तो हरवलेल्या गायीसारखा...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.