---Advertisement---

‘मी आजही खेळू शकतो…’, विराटचं नाव घेत कमबॅकविषयी काय म्हणाला डिविलियर्स

On: बुधवार, जुलै 5, 2023 7:43 PM
Virat Kohli, Glenn Maxwell, Faf du Plesis, AB de Villiers
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार एबी डिविलियर्स याचे चाहते जगभरात आहेत. 2018साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर डिविलियर्सच्या पुनरागमनाच्या बातम्या नेहमीच येत अशतात. आगामी वनडे विश्वचषकाच्या आधीही डिविलियर्सच्या पुनरागमनाविषीय चर्चा होत आहेत. स्वतः डिविलियर्सने आता यावर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचे नाव घेत प्रतिक्रिया दिली.

एबी डिविलियर्स (AB de Villiers) दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा महान कर्णधार राहिला. पुनरागमनाविषयी प्रश्न विचारला असता, तो आजही क्रिकेट खेळू शकतो, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. पण त्याचसोबत काही कारणेही सांगितली, ज्यामुळे तो खेळत नाहीये. यावेळी विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या दोन भारतीय दिग्गजांच्या उल्लेख डिविलियर्सकडून सर्वोत्तम असाही झाली.

जिओ सिनेमावर बोलताना डिविलियर्सला क्रिकेटमध्ये पुनरागमनाविषयी प्रश्न विचारला गेला. यावर उत्तर मिळाले की, “मी नक्कीच आजही खेळू शकतो, पण आता ती पहिल्यासारखी आग राहिली नाहीये. मी नेहमीच सर्वोत्तम प्रदर्शन करू इच्छितो. जर मी पुनरागमन केले, तर आपले सर्वोत्तमच देण्याचा प्रयत्न करेल. अशात सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्याशी तुलना व्हावी असे मला वाटते.”

“जर तुम्ही वर्षातून फक्त तीनच महिने क्रिकेट खेळत असाल, तर तुम्ही सर्वोत्तम प्रदर्शन करू शकत नाही. राहिलेल्या नऊ महिन्यात जरी तुम्ही सराव केला, तरी सर्वोत्तम प्रदर्शन प्रदर्शन करू शकणार नाही. सामना खेळून होणाऱ्या सरावापेक्षा अधिक चांगले काहीच असू शकत नाही,” असे डिविलियर्स पुढे म्हणाला.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा हा माजी दिग्गज 2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आयपीएलसह जगभरातील टी-20 लीग गाजवत होता. मात्र, 2021मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये विराट कोहली आणि डिविलियर्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी बरीच वर्ष एकत्र खेळले आहेत. दुसरीकडे भारताचा महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादवची तुलना नेहमीच डिविलियर्ससोबत झाली. (AB de Villiers on comeback in cricket)

महत्वाच्या बातम्या –
भीषण अपघातानंतर प्रवीण कुमारणे सांगितलं जीव वाचण्याचं कारण! वाचा काय म्हणाला माजी वेगवान गोलंदाज
BREAKING । तिसऱ्या ऍशेस सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर, संघातून अँडरसनचा पत्ता कट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---