चेन्नई सुपर किंग्स संघाने सोमवारी (दि. 3 एप्रिल) चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर शानदार विजय मिळवला. पहिल्या सामन्यात पराभव पत्करून लखनऊ सुपर जायंट्स संघाचा सामना करताना चेन्नईने 12 धावांनी विजय मिळवला. चेन्नईच्या या विजयात मोईन अली याने मोलाचा वाटा उचलला. त्याने 4 षटकात 26 धावा खर्च करून 4 विकेट्स घेतल्या. या सामन्यात चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 217 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघाला 20 षटकात 7 विकेट्स गमावत 205 धावाच करता आल्या. या विजयानंतर मोईन अलीला त्याच्या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
मोईन अली (Moeen Ali) याच्या कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने कौतुकाचे पूल बांधले. तो म्हणाला की, एमएस धोनी (MS Dhoni) हादेखील मोईनच्या विकेट घेण्याच्या खासियतवर खूपच अवलंबून असतो. डिविलियर्स म्हणाला की, “जेव्हाही दबावात विकेट घ्यायची असते, तेव्हा मोईन अली नेहमीच धोनीची पहिली पसंद असतो. मला वाटते की, त्याने आधीच गोलंदाजी केली पाहिजे होती, पण एमएस मास्टर आणि गुरू आहे, त्याला गोष्टी माहिती आहेत.”
For his match-winning all-round performance in @ChennaiIPL's first home game of the season, Moeen Ali receives the Player of the Match award 🙌🏻#CSK registered a 12-run victory over #LSG 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/buNrPs0BHn#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/C4sEj6ezNC
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2023
यावेळी सुरेश रैना (Suresh Raina) यानेही मोईन अलीच्या मॅच विनिंग क्षमतेची प्रशंसा केली. तो म्हणाला की, “जेव्हाही तो गोलंदाजी करतो, तो नेहमीच चेंडू फलंदाजापासून दूर ठेवतो आणि माही भाईला हे माहितीये. कारण, केएल राहुल हा महत्त्वाचा खेळाडू आहे. भारतासाठीही आणि आयपीएलच्या हिशोबानेही. कारण, त्याने यापूर्वीही 600 हून अधिक धावा केल्या आहेत.”
चेन्नईचा डाव
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर चेन्नईने 7 विकेट्स गमावत 217 धावा केल्या होत्या. यामध्ये चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याच्या अर्धशतकाचा समावेश होता. त्याने 31 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी साकारली होती. त्याच्याव्यतिरिक्त डेवॉन कॉनवे यानेही 47 धावांची महत्त्वाची खेळी साकारत संघाच्या धावसंख्ये मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्याव्यतिरिक्त शिवम दुबे आणि अंबाती रायुडू यांनी प्रत्येकी 27 धावा केल्या. तसेच, मोईन अली यानेही 19 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात एमएस धोनी याने 2 षटकार मारत 12 धावा केल्या.
यावेळी लखनऊकडून गोलंदाजी करताना मार्क वूड आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 3 विकेट्स नावावर केल्या. याव्यतिरिक्त आवेश खान याला 1 विकेट मिळाली. (ab de villiers on moeen ali said he is always ms dhoni s first pick of man to go and pick up wickets under pressure )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीने सामनाच नाही, तर मनेही जिंकली; विजयानंतर ‘माही’चा अन् गौतमच्या मुलीचा प्रेमळ फोटो तुफान व्हायरल
रश्मिकाला नाचताना पाहून स्वत:ला रोखू शकले नाहीत गावसकर, लावले जोरदार ठुमके; पाहा व्हिडिओ