दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सने (Ab De Villiers) टायटन्स लिजेंड्ससाठी खेळताना तुफानी शतक झळकावले आहे. त्याने केवळ 28 चेंडूत 101 धावा केल्या आहे. एबीच्या या खेळीत त्याची जुनी झलक पाहायला मिळाली.
AB DE VILLIERS SMASHED A 28 BALL HUNDRED FOR TITANS LEGENDS. pic.twitter.com/lcdqfyqt1D
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 9, 2025
एबी डिव्हिलियर्सच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीदबद्दल बोलायचे झाल्यास, डिव्हिलियर्सने 2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 2005 मध्ये वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
डिव्हिलियर्सने कसोटी, वनडे आणि टी20 अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर वनडे क्रिकेटमधील सर्वात जलद 50, 100 आणि 150 धावा करण्याचा विक्रम आहे.
डिव्हिलियर्सने कसोटी क्रिकेटमध्ये 22 शतकांसह 46 अर्धशतके झळकावली आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 25 शतके आणि 53 अर्धशतके आहेत. टी20 क्रिकेटमध्ये त्याने 10 अर्धशतके झळकावली आहेत.
डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली संघाला अनेक विजय मिळवून दिले. पण आयसीसी ट्राॅफी संघाला मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.
डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2021 मध्ये त्याने आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली. डिव्हिलियर्स त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो ‘मिस्टर 360’ म्हणून प्रसिद्ध आहे, कारण तो मैदानाच्या कोणत्याही दिशेने फटके मारू शकतो. तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक देखील होता. डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. तो दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासातील एक महान खेळाडू आहे.
एबी डिव्हिलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द-
कसोटी- 114 सामने, 8,765 धावा, 22 शतके
वनडे- 228 सामने, 9.577 धावा, 25 शतके
टी20- 78 सामने, 1,672 धावा, 10 अर्धशतके
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितने षटकार ठोकून गाठले नवे शिखर; बाबर आझमलाही टाकले मागे
IND vs NZ: अंतिम सामन्यात कुलदीपची जादू चालली, किवी संघाला पाणी पाजलं.!
न्यूझीलंडची दमदार कामगिरी; फायनलमध्ये मोडला ‘या’ संघाचा विक्रम