---Advertisement---

आयपीएल सुरू होण्यापूर्वी या खेळाडूने केली सिंहगर्जना; म्हणाला, आम्हीच जिंकणार आयपीएलचे जेतेपद

On: मंगळवार, सप्टेंबर 15, 2020 10:26 AM
---Advertisement---

मुंबई । नेहमीप्रमाणे यंदाही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (आरसीबी) आयपीएल विजेतेपद मिळविण्याचे लक्ष्य आहे. दिग्गज फलंदाजांची फौज असूनही अद्याप हा संघ आयपीएल चॅम्पियन बनलेला नाही. पण या हंगामात असे वाटते की, हा संघ कमाल करू शकतो. संघाचा कर्णधार विराट कोहली आणि स्फोटक फलंदाज एबी डिविलियर्स परिश्रम घेत आहेत. दरम्यान, विराटच्या कर्णधारपदाबद्दल डिविलियर्सने एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

डिविलियर्सने विराट कोहलीचे कौतुक करत सांगितले की, आरसीबीचा कर्णधार नेहमीच पुढे जाऊन संघाचे नेतृत्व करतो. तो युवा खेळाडूंसाठी एक उदाहरण तयार करतो. डिविलियर्सचा असा विश्वास आहे की, विराट कोहलीचे अनुकरण करणे इतर खेळाडूंसाठी सोपे आहे.

आरसीबीच्या अधिकृत संकेतस्थळावर बोलताना तो म्हणाला, “मला वाटतं की एका महिन्यापूर्वी आयपीएलविषयी गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. आयपीएल सुरू करण्यात बीसीसीआयने उत्तम काम केले आहे. आमचा संघ स्पर्धा खेळण्यासाठी खूप उत्साही आहे. मला पूर्वीपेक्षा बरं वाटत आहे, म्हणून मी संघातील खेळाडूंसोबत तिथे चांगले खेळून संघाला मदत करू इच्छित आहे.”

आयपीएलच्या 13 व्या हंगामात आरसीबी संघ आपला पहिला सामना 21 सप्टेंबर रोजी दुबईत सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबीकडून 154 सामने खेळणारा डिविलियर्स पुढे म्हणाला की, “संघातील सर्व खेळाडू परिश्रम घेत आहेत. त्याने याचे श्रेय कर्णधार विराटला जाते. यावर्षी संघाला वेगळं काहीतरी जाणवत आहे. आमच्याकडे बॅक अप आहे. विराट आणि प्रशिक्षक सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनची निवड करू शकतात. आमच्याकडे प्रत्येक विभागात पर्याय आहे.”

विराटला देखील आपल्या संघाकडून अपेक्षा आहेत. यावेळी आरसीबी संघ त्यांच्या चाहत्यांना विजयाचा आनंद मिळवून देऊ शकेल का?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-माजी दिग्गजही झाला विंडीजच्या ‘या’ खेळाडूचा चाहता; केली डिविलियर्ससोबत बरोबरी

-या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या मनोबलाला बसेल फटका; दिग्गजाने व्यक्त केले मत

-अर्जुन तेंडूलकरचे फोटो होतायत व्हायरल, थेट मुंबई इंडियन्सच्या…

ट्रेंडिंग लेख-

-४ असे माजी कर्णधार, जे यावेळी होऊ शकतात संघासाठी वॉटरबॉय

-एक आयपीएल फॅन म्हणून हे ५ संस्मरणीय क्षण विसरणे केवळ अशक्य…!!!

-मुंबई इंडियन्सला ५व्यांदा विजयी करण्यासाठी हे तीघे खेळाडू करणार जीवाचं रान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---