भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमधील एक आहे. तसेच सध्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याला देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानले जाते. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंमध्ये नेहमीच तुलना केली जात असते. अशातच माजी पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडूने याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तान संघाच्या माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकने म्हटले आहे की “या दोघांची तुलना करायची असेल तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवा. त्यात कोण श्रेष्ठ आहे हे कळून जाईल.”
तसेच पाकिस्तानच्या खेळाडूंची तुलना भारतीय खेळाडूंसोबत होऊ शकत नाही; कारण, पाकिस्तानमध्ये जास्त टॅलेंट आहे, असेही रज्जाक याने म्हटले आहे. तसेच विराट कोहली आणि बाबर आजम यांच्यात तुलना करणे बंद करा, कारण दोघे ही वेगवेगळ्या शैलीचे क्रिकेटपटू आहेत, असे वक्तव्य केले आहे.
पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त टॅलेंट
अब्दुल रज्जाक याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “यापूर्वी आम्ही असे कुठलेच वक्तव्य केले नाही. तुम्ही भारतीय खेळाडूंची तुलना पाकिस्तानी खेळाडूंसोबत करू शकत नाही. कारण पाकिस्तानकडे जास्त टॅलेंट आहे. तुम्ही जर इतिहासात बघाल तर अनेक महान खेळाडू होऊन गेले ज्यांची तुलना आम्ही मोहम्मद यूसुफ, इंजमाम-उल-हक, सईद अनवर, जावेद मियाँदाद, जहीर अब्बास आणि इज़ाज़ अहमद यांच्यासोबत करू शकतो.”
बाबर आणि कोहली यांच्यातील श्रेष्ठ खेळाडू ठरवण्यासाठी भारत आणि पाकिस्तान सामना खेळवा
अब्दुल रज्जाक म्हणाले,”विराट कोहली आणि बाबर आजम हे दोघेही वेगवेगळ्या शैलीचे खेळाडू आहेत. या दोघांमध्ये तुलना करायची असेल तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवा. त्यानंतर निर्णय घेता येईल की कोण श्रेष्ठ आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले,”कोहली एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि तो पाकिस्तान संघाविरुद्ध चांगले प्रदर्शन देखील करतो. मी या गोष्टीला विरोध करत नाही. परंतु जर भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंसोबत तुलना करत नाहीत, तर आपणही असे करणे थांबवायला हवे,” असे वक्तव्य माजी पाकिस्तान संघातील अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाक यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मायकेल वॉनने केलेल्या टीकेवर संतापला जोफ्रा आर्चर, तिखट प्रत्युतर देत म्हणाला..
दमदार शतकासह ‘या’ कॅरेबियन फलंदाजाने विराटला सोडले मागे, फिंचची केली बरोबरी
स्वदेशी ॲप ‘कू’ची क्रिकेटपटूंनाही भुरळ, अनिल कुंबळेसह अनेकांनी उघडले खाते