---Advertisement---

महिला क्रिकेट स्पर्धेत आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय विजयी

On: रविवार, सप्टेंबर 30, 2018 6:13 PM
---Advertisement---
पुणे: जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे महानगरपालिका आयोजित शालेय जिल्हा स्तरीय क्रिकेट स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय विजयी झाले.
अंतिम सामन्यात त्यांनी एंजेल मिकी हायस्कुल संघाचा ९ गडी राखून पराभव केला. ३० सप्टेंबर रोजी हा अंतिम सामना आझम कॅम्पस मैदानावर झाला .
विजयी संघाचे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्यकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार ,उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,सचिव लतीफ मगदूम ,तसेच आझम स्पोर्ट्स एकेडमी चे संचालक गुलझार शेख, महाविद्यालयाचे उप प्राचार्य गफार शेख यांनी अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment