टीम इंडियात सहभागी होताच अभिषेक शर्मा धुमाकुळ घालत आहे. कारकिर्दीतील पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते न उघडता बाद झालेल्या अभिषेकने दुसऱ्या सामन्यात आक्रमक शतक ठोकून सर्वांना अवाक केले. या शतकासह अभिषेकने हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माचा विक्रमही मोडला. रोहित शर्माचा विक्रम मोडून अभिषेक नवा ‘सिक्सर किंग’ बनला आहे.
वास्तविक, सध्या भारतीय संघ पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, ज्यात तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात अभिषेकने जोरदार पुनरागमन करत 47 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या.
या डावात मारलेल्या 8 षटकारांच्या मदतीने अभिषेक 2024 मध्ये टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला. त्याने रोहित शर्माला मागे टाकले. अभिषेकच्या शतकापूर्वी, रोहित शर्मा या वर्षी टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता, ज्याने 46 षटकार ठोकले होते. मात्र, आता या यादीत अभिषेकने 20 षटकारांसह अव्वल क्रमांक पटकावला आहे. या यादीत विराट कोहली 45 षटकारांसह तिसऱ्या, शिवम दुबे 41 षटकारांसह चौथ्या आणि रजत पाटीदार 33 षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे.
या वर्षी (2024 मध्ये) टी20 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय फलंदाज
अभिषेक शर्मा- 50* षटकार
रोहित शर्मा- 46 षटकार
विराट कोहली- 45 षटकार
शिवम दुबे- 41* षटकार
रजत पाटीदार- 33* षटकार
या वर्षी (2024) खेळल्या गेलेल्या आयपीएलमध्ये अभिषेकने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना जबरदस्त फलंदाजी केली. 16 सामन्यांच्या 16 डावात फलंदाजी करताना त्याने 32.27 च्या सरासरीने आणि 204.22 च्या स्ट्राइक रेटने 484 धावा केल्या होत्या. त्याच्या या आक्रमक खेळामुळे झिम्बाब्वे दाैऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे.आणि दुसऱ्याच सामन्यात धडाकेबाज शतक ठोकून त्यांने निवड सामितीने ठेवलेल्या विश्वसास तो पात्र ठरला आहे.
महत्तवाच्या बातम्या-
मोठी अपडेट! श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ या तारखेला होणार जाहीर
विराट कोहलीच्या रेस्टॉरंटवर पोलिसांची कारवाई, रात्री 1.30 वाजेपर्यंत सुरू होता धुमाकूळ
विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत लंडनमध्ये कीर्तनाला पोहचला? व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणून घ्या