डिसेंबर २०१९मध्ये रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि श्रीलंका संघात झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. परंतु पाकिस्तानच्या आबिद अलीच्या कामगिरीमुळे तो सामना अविस्मरणीय ठरला होता. अलीचा तो पहिलाच कसोटी सामना होता आणि त्यामध्ये त्याने शतकी खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पहिला खेळाडू होण्याचा मान पटकाविला. पाकिस्तानच्या निवडकर्त्यांनी एकेकाळी लठ्ठपणामुळे अलीकडे दुर्लक्ष केले होते. परंतु ३२ वर्षीय अलीने हार मानली नाही. त्याने मेहनत घेतली आणि संधी मिळताच त्याने आपली उपयुक्तता अवघ्या क्रिकेट जगताला दाखवून दिली.
श्रीलंका क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ल्यानंतर १० वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाला समस्या आली. परंतु अलीच्या रूपात पाकिस्तानला एक नवा धडाकेबाज फलंदाज मिळाला. पावसाच्या व्यत्ययामुळे तो सामना अनिर्णित राहिला. त्या कसोटी सामन्यात अलीने शतक ठोकले आणि वनडे तसेच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक ठोकणारा पहिला खेळाडू बनला. त्याने रावळपिंडी येथे नाबाद १०९ धावांची शतकी खेळी केली, तर मार्चमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण करत ११२ धावांची शतकी खेळी केली होती.
लाहोरच्या मोजांग भागात राहणाऱ्या अलीला (Abid Ali) शहरातील निवडकर्त्यांनी एकदा नाकारले होते. त्याने इस्लामाबाद संघाकडून खेळताना २०१२-१३ च्या मोसमात १०८३ धावा केल्या होत्या. इतकी चांगली कामगिरी करूनही निवडकर्त्यांनी त्याला महत्त्व दिले नाही. निवडकर्त्यांचे असे मत होते की, तो लठ्ठ आहे आणि फीटही नाही. इंग्लंडविरुद्ध ५ धावांवर बाद झाल्यानंतर अलीला वनडे विश्वचषक संघातूनही वगळण्यात आले होते. त्यामुळे त्याने आपला आदर्श व्यक्तिमत्त्व भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरची भेट घेण्याची संधीही गमावली.
“मला सचिनची भेट घेता आली नाही. कारण मी विश्वचषक संघात नव्हतो. मी वाट पाहणे सोडले नाही आणि मला माहीत होते की माझीही वेळ येईल,” असे तो म्हणाला.
अलीला खूप मेहनतीनंतर श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानकडून खेळण्याची संधी मिळाली. पावसामुळे पहिल्या ३ दिवसात ९१.३ षटकेच टाकण्यात आल्या, तर चौथ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. सामन्याच्या शेवटी म्हणजेच पाचव्या दिवशी अलीने शतक ठोकले.
३२ वर्षीय अलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उशिरा यश मिळाले. त्याने पाकिस्तान संघाकडून ३ कसोटी सामने आणि ४ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ३२१ धावा आणि वनडेत १९१ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारतासाठी आलेल्या मोठ्या गुड न्यूजमुळे पाकिस्तानच्या अख्तरचे दुखले पोट
-नर्व्हस नाइंटीजचा सर्वाधिक वेळा शिकार झालेले भारतीय क्रिकेटर, धोनी तर
-एमएस धोनीसह हे ७ क्रिकेटर परत कधीही खेळताना दिसणार नाही विश्वचषक