---Advertisement---

मॅच फिक्सिंगची एक चूक अन् कारकिर्दीवर लागला पूर्णविराम; नाहीतर आज असता जडेजाचा पर्यायी अष्टपैलू!

On: शुक्रवार, मे 21, 2021 2:10 PM
---Advertisement---

क्रिकेटसारख्या जेंटलमन खेळात मॅत फिक्सिंगसारखा प्रकार घडणे म्हणजे कलंक लागण्यासारखेच असते. एका सामन्यात फिक्सिंग केल्यामुळे खेळाडूची संपूर्ण कारकीर्द संपुष्टात येते. भारतातही असे काही क्रिकेटपटू होऊन गेले, ज्यांनी फिक्सिंग केली नसती तर त्यांना पुढे जाऊन भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हटले गेले असते. यात असा एक असा खेळाडू देखील आहे, ज्याने मॅच फिक्सिंगसारखा प्रकार केला नसता तर आता तो भारतीय संघात रवींद्र जडेजाचा पर्यायी अष्टपैलू बनला असता.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाकडून आपल्या क्रिकेट कारिकिर्दीची सुरुवात करणारा ३१ वर्षीय अष्टपैलू खेळाडू अबरार काजी. त्याने २०११ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून अबरार काजीने १७ प्रथम श्रेणी सामने, ३५ लिस्ट ए सामने आणि ८ टी-२० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने, १७ प्रथम श्रेणी सामन्यात २१.७६ च्या सरासरीने ४८ गडी बाद केले आहेत. यासोबतच त्याने ११३६ धावा देखील केल्या आहेत. तसेच लिस्ट ए सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ४७ गडी बाद केले आहेत आणि ४३७ धावा देखील केल्या आहेत.

केपीएल २०१९ मध्ये केली होती फिक्सिंग
आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना पैशांसाठी अबरार काजीने मॅच फिक्सिंगसारखा प्रकार केला होता. ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीला वेगळे वळण मिळाले. जर त्याने पैशांचा मोह केला नसता तर तो, वर्तमान काळात रवींद्र जडेजाला टक्कर देत असता.

तर झाले असे की, केपीएल (कर्नाटक प्रीमियर लीग) २०१९ स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात बल्लारी टस्कर्स आणि हुबली टायगर्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. हा सामना फिक्स करण्यासाठी अबरार काजी आणि सीएम गौतम याला २०-२० लाखांची ऑफर देण्यात साली होती. परंतु हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दोघांनाही क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी ७ नोव्हेंबर २०१९ रोजी अटक केली होती.

रणजी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी
अबरार काजीने २०१८ मध्ये झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकित करून टाकले होते. त्याने नागालँड संघासाठी खेळताना उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती. त्याने ८ सामन्यात ७४.०० च्या सरसरीने ८१४ धावा केल्या होत्या. यासोबतच गोलंदाजी करताना त्याने ३४ गडी देखील बाद केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीच्या काळात हिट ठरलेली ‘कुलचा’ जोडी का तुटली? स्वत: युजवेंद्र चहलने सांगितले कारण

इंग्लंड दौरा नडला; ५ भारतीय क्रिकेटपटू, जे इंग्लंडच्या भूमीत ठरले फ्लॉप अन् कसोटी संघातून मिळाला डच्चू

तीन वर्षांपुर्वीच द्रविडला मिळाली होती टीम इंडियाचा महागुरु बनण्याची ऑफर, ‘या’ कारणामुळे दिला होता नकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---