---Advertisement---

अंपायरला शिवीगाळ करणं पडले महागात! मुंबई इंडियन्सच्या दिग्गजावरती बीसीसीआयची कारवाई; वाचा सविस्तर

On: शुक्रवार, मे 15, 2026 7:01 PM
---Advertisement---

धरमशाळेच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना पंजाब किंग्सने २०० धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने दमदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला. दरम्यान सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्ससाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयकडून मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक कायरन पोलार्डवर कारवाई करण्यात आली आहे.

या सामन्यानंतर कायरन पोलार्डवर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती आयपीएलने आपल्या प्रेस रिलीझमधून दिली आहे. कायरन पोलार्डच्या मॅच फी वर १५ टक्के दंड आकारण्यात आला आहे. पोलार्डने आयपीएलच्या आचार संहितेच्या लेव्हल-१ चे उल्लंघन केले आहे. दंड ठोठावण्यासह १ डिमेरिट पॉईंट देखील देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कायरन पोलार्डने चौथ्या अंपायरला शिवीगाळ केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलार्डने आचारसंहितेच्या कलम २.३ चे उल्लंघन केल्याची कबुली दिली आहे. आयपीएलचे काही नियम आहेत, ते मोडले की खेळाडू असो, प्रशिक्षक असो किंवा मग अधिकारी, आयपीएलकडून कारवाई केली जाते. कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. त्याने लाईव्ह सामन्यादरम्यान चौथ्या अंयायरविरुद्ध अश्लील भाषेचा वापर केला होता.

या सामन्यात पंजाब किंग्स संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाबकडून सलामीला आलेल्या प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर प्रियांश आर्यने २२ धावा केल्या. तर अझमतुल्लाह ओमरजाईने शेवटी फलंदाजी करताना ३८ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर पंजाबने २० षटकांअखेर २०० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने नाबाद ७५ धावांची खेळी केली. त्याला विल जॅक्सची चांगली साथ मिळाली. त्याने २५ धावांचे योगदान दिले. मुंबईने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---