आशिया चषक 2023 मध्ये शनिवार (2 ऑगस्ट) भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने असणार आहेत. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल फिटनेसच्या कारणास्तव पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर आजाल आहे. तर दुसरीकड जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांनी आपल्या फिटनेसविषयी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. अनेकांच्या मते भारतीय संघाचा फॉर्म सध्या चांगला नाहीये. मात्र, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री याच्याशी सहमत नाहीत.
रवी शास्त्री (Ravi Shastri) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामन्याच्या पूर्वसंध्येला दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी बोलले. शास्त्रींच्या मते पाकिस्तान एक चांगला संघ आहे. मागच्या काही वर्षांमध्ये त्यांना भारतीय संघाची बऱ्यापैकी बरोबरी देखील केली आहे. मात्र, अजूनही संघातील अंतर कायम आहे. शात्रींना वाटते की, अनुभवी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि संघाच्या फलंदाजी क्रमामुळे भारताला अधिक मजबुती मिळते. शास्त्रींनी यावेळी बोलताना एक मोठे विधान देखील केले. त्यांच्या मते 2011 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघानंतर सध्याचा संघ सर्वोत्तम आहे.
“मी म्हणते भारतीय संघ विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. हा त्यांचा 2011 नंतरचा सर्वोत्तम संघ आहे. हे खेळाडूंचे एक चांगले मिश्रण आहे. संघाकडे असा कर्णधार आहे, ज्याला मैदान इतरांच्या तुलनेत चांगले समजते,” असे रवी शात्री यावेळी म्हणाले.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा पहिला सामना शनिवारी कँडीमध्ये खेळला जाणार आहे. उभय संघांतील या सामन्यांसाठी सर्वजण मागच्या काही महिन्यांपासून वाट पाहत आहेत. पाकिस्तान आशिया चषकाचा यजमान संघ अशून मालिकेतील हा त्यांचा दुसरा सामना आहे. तर दुसरीकडे पाहुणा भारतीय संघ या सामन्यातून आशिया चषक अभियानाची सुरुवात करणार आहे.
भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत कशामुळे?
दरम्यान, आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र मालिकेतील तब्बल 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. अवघ्या चार सामन्यांचे आयोजन पाकिस्तानमध्ये केले गेले आहे. यासाठी कारणीभूत ठरला तो भारतीय संघ. भारतीय संग आणि बीसीसीआय सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या खेळाडूंना पाकिस्तानमध्ये पाढवण्यास तयार नव्हते. अशात आशियाई क्रिकेट परिषदेच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली गेली. या मॉडेलमध्ये भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित करण्याचे ठरले आहे. त्याचसोबत बाद फेरीचे सामनेही श्रीलंकेतच आयोजित केले गेले आहेत. (According to Ravi Shastri, this is India’s best team since the 2011 ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
IND vs PAK महामुकाबल्यापूर्वी माजी खेळाडूचा बाबरला मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘भारताविरुद्ध हारलो तरीही…’
पाकिस्तानविरुद्ध जिंकायचंय? तर भारतीय संघाला ‘या’ 3 समस्यांवर काढावा लागेल तोडगा