वनडे विश्वचषकात भारतीय संघाचा पराभव चाहत्यांना अपेक्षित नव्हता. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात, भारताला 6 विकेट्सने पराभव मिळाला. प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजी विभागात भारतीय संघ अपयशी ठरला. पराभवात खेळपट्टीची भूमिका महत्वाची राहिला. खेळपट्टीबाबत अनेक प्रतिक्रिया समोर येत असतानाच ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग यानेही आपले मत मांडले.
वनडे विश्वचषक 2023 (CWC 2023) हंगाम 5 ऑक्टोबर रोजी सुरू झाला आणि 19 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला. रविवारी, अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. 50 षटकांच्या सामन्यात भारतीय संघ 240 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य 43 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. ऑस्ट्रेलियासाठी हा विश्वचषक इतिहासातील सहावा विजय ठरला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाला 2003 आणि 2007 वनडे विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) विश्वचषकाच्या चालू हंगामात समालोचकाची भूमिका पार पाडताना दिसला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने ट्रॉफी उंचावल्यानंतर पाँटिंगने खेळपट्टी आणि खेळाडूंसोबत झालेल्या संवादाचा खुलासा केला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी खेळपट्टी भारतीय संघासाठी प्रतिकूल ठरली. पाँटिंगच्या मते भारतासाठी तयार केली गेलेली ही खेळपट्टी ऐन वेळी त्यांच्यावर उलटली. भारताच्या पराभवानंतर पाँटिंग म्हणाला, “आज याठिकाणची परिस्थिती उपखंडाप्रामाणे होती. स्पष्ट स्पष्ट सांगायचे झाले, तर जी खेळपट्टी बनवली गेली होती, ती भारतीय संघावर उलटली.”
क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणल्या जाणाऱ्या रिकी पाँटिंगने पुढे ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत झालेल्या चर्चेचाही खुलासा केला. पाँटिंगच्या मते अंतिम सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू खेळपट्टीविषयी चिंतेत होते. पण खेळपट्टीचा जास्त विचार करू नका, असा सल्ला पाँटिंगने त्यांना दिला. “ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू खेळपट्टीमुळे चिंतेत होते. पण मी त्यांना म्हणालो, खेळपट्टीचा विचार करू नका. ही फक्त एक क्रिकेटची खेळपट्टी आहे, जी 22 यार्ड लांब आहे. मैदानात जा आणि आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन द्या. खेळाडूंनी अगदी तसेच केले.”
दरम्यान, ऑस्ट्रेलियासाठी या सामन्याच ट्रेविस हेड याचे प्रदर्शन सर्वात महत्वाचे ठरले. हेडने 120 चेंडूत ऑस्ट्रेलियासाठी 137 धावांची खेळी केली. मार्नस लॅबुशेन यानेही 58* धावांची महत्वपूर्ण खेळी केली. गोलंदाजी विभागात मिचेल स्टार्क याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स नावावर केल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि ऍडम झॅम्पा यांनाही प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. (According to Ricky Ponting, the Indian team lost the final because the pitch was overturned)
महत्वाच्या बातम्या –
पराभवानंतर भारतीय गोलंदाजाच्या घराला पोलीस सुरक्षा, चिडलेल्या चाहत्यांमुळे आधीच घेतली खबरदारी
आयसीसीचा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला तात्पुरता दिलासा, खेळण्याची दिली परवानगी पण…