---Advertisement---

भारतीय क्रिकेटर्सशी लग्नगाठ बांधणाऱ्या अभिनेत्री, ज्यांनी विवाहानंतर बॉलिवूडला ठोकला रामराम

On: रविवार, जून 12, 2022 12:32 PM
Hardik-Natasha-Sagrika-Zaheer
---Advertisement---

क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते फार जुने आहे. अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी बॉलीवूड अभिनेत्रींसोबत लग्न केले आहेत. तसेच काही क्रिकेटपटूंचे नाव बॉलीवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. आता यामध्ये काही नाते असेही आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रींनी लग्नानंतर सुद्धा अभिनय करणे सोडले नाहीये. पण, काही अभिनेत्रींसाठी त्यांची कारकीर्द संपल्यात जमा झाली आहे. चला जाणून घेऊया की, कोण आहेत, त्या अभिनेत्रीं ज्यांनी लग्नानंतर अभिनयाला रामराम ठोकला आहे.

अशा पाच अभिनेत्री ज्यांनी लग्नानंतर अभिनयाला दिला निरोप

१. हार्दिक पंड्याची पत्नी नताशा स्टेनकोविक
सर्बियाई मॉडेल, अभिनेत्री व डांसर नताशा स्टेनकोविक या यादीत सर्वात वरती आहे. आईपीएल २०२२ चा विजेता कर्णधार हार्दिक पंड्याची पत्नी नताशा स्टेनकोविकने लग्नानंतर आपल्या बॉलीवूड कारकिर्दीला नकार दिला. जेव्हा पूर्ण देशात कोविड-१९ मुळे लॉकडाउन होता, तेव्हा भारताचा स्टार अष्टपैलु खेळाडू हार्दिक पंड्या आणि नताशाने लग्न केले होते. नताशा ने २०१४ मध्ये “सत्याग्रह” चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये प्रवेश केला होता. त्या चित्रपटामध्ये तिने अइयो जी गाण्यावर नृत्य केले होते.

नताशा २०१४ साली बिगबॉसची सदस्य सुद्धा होती. तसे तर नताशाने अनेक गाण्यांवर नृत्य केले आहेत. पण, २०१७ मध्ये आलेल्या “ओह मेरी महबूबा” गाण्याने कमालच केली. त्यानंतर २०१९ साली आलेल्या “झलक दिखला जा रीलोडेड” गाण्यामध्ये ती अखेरची दिसली होती. २०२० च्या सुरूवातीस हार्दिक आणि नताशाने साखरपुडा केला आणि त्यानंतर लग्न केले.

२. जहीर खानची पत्नी सागरिका घाटके
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जहीर खानने बॉलीवुड अभिनेत्री सागरिका घाटकेसोबत लग्न केले. शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’ या सुपरहिट असलेल्या चित्रपटाद्वारे सागरिका घाटके हिने बॉलीवुडमध्ये प्रवेश केला. २०१७ साली आलेल्या ‘इरादा’ या चित्रपटात ती अखेरची अभिनय करताना दिसली.

२०१७ मध्येच सागरिका आणि जहीर विवाहबंधनात अडकले आणि त्यानंतर सागरिका बॉलीवुड चित्रपटांमध्ये दिसली नाही. तसेच, २०१३ मध्ये सागरिकाने फियर फॅक्टर खतरों के खिलाड़ीच्या सहाव्या पर्वात भाग घेतला होता आणि विशेष म्हणजे ती फाइनलपर्यंत पोहोचली सुद्धा होती.

३. हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज हरभजन सिंगची पत्नी गीता बसराने सुद्धा लग्नानंतर अभिनयाला निरोप दिला आहे. गीताने २००६ मध्ये ‘दिल दिया है’ या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये प्रवेश केला. ८ वर्ष प्रेमबंधनात राहिल्यानंतर गीता आणि हरभजनने २०१५ मध्ये लग्न केले. तरीही २०१५ मध्ये ‘सेकेंड हेंड हस्बेंड’ आणि २०१६ मध्ये ‘लॉक’ या चित्रपटांमध्ये काम केले. पण, ‘लॉक’ हा गीताचा शेवटचा चित्रपट ठरला.

४. युवराज सिंगची पत्नी हेजल कीच
अभिनेत्री हेजल कीच हिने सलमान खान व करीना कपूर यांच्यावर चित्रीत ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर हेजलने ५ चित्रपटांमध्ये काम केले. हेजल कीच आणि युवराज सिंहचे लग्न २०१६ साली झाले. ‘बांके की क्रेजी बारात’ मध्ये हेजल कीचने नृत्य केले होते आणि त्यानंतर तिने अभिनय सृष्टीला निरोप दिला.

५. मोहम्मद अजरुद्दीनची पत्नी संगीता बिजलानी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनने १९९६ साली आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देउन बॉलीवुड अभिनेत्री आणि १९८० सालची मिस इंडिया संगीता बिजलानीसोबत लग्न केले. १९९६ साली आलेल्या ‘निर्भय’ या चित्रपटानंतर तिने चित्रपटांमध्ये काम केले नाही. पण अजहरुद्दीन -संगीताचे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांनी २०१० ला घटस्फोट घेतला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsSA: टी२० मालिकेत परतण्यासाठी भारत कोणते हातखंडे वापरणार? भुवनेश्वर कुमारने केले स्पष्ट

स्लेजिंगचे बादशाह समजले जाणारे पाकिस्तानी दिग्गज, खरं तर क्रिकेटचे आर्य चाणक्य होते!

गोल मटोल बनत चाललेल्या पृथ्वी शॉला चाहत्याकडून वजन कमी करण्याचा सल्ला, कमेंट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---