Rishabh Pant : इंडियन प्रीमियर लिग स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत मोठ्या अडचणीत सापडला आहे. रिषभ पंतवर बंदीची कारवाई होण्याची शक्यता आहे. कर्णधार रिषभ पंतवर आयपीएलमध्ये एका सामन्यासाठी बंदी घातली जाऊ शकते, अशी सध्या परिस्थिती आहे. ( Action on Rishabh Pant due to slow over rate )
दिल्ली संघाचा यष्टिरक्षक – फलंदाज तथा संघाचा कर्णधार असलेल्या रिषभवर यापूर्वीही यंदाच्या आयपीएल सामन्यात दोनवेळा दंडात्मक कारवाई कऱण्यात आलीये. सामन्यात षटकांची गती कायम राखण्यात तो दोनदा अपयशी ठरल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आलीये. पहिल्यांदा 12 लाखांचा तर दुसऱ्यांदा 20 लाखांचा दंड त्याला यापूर्वीच ठोठावण्यात आलाय.
परंतू आता त्याने पुन्हा एकदा तशी चूक केल्यास त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात येऊ शकते. तिसऱ्यांदा देखील दिल्ली संघाने तीच चूक केली अन् षटकांची गती संथ राखली तर दंडाची रक्कम 30 लाख रुपये होईल आणि कर्णधारावर एका सामन्याची बंदी करण्यात येईल.
अधिक वाचा –
– चेन्नईचे ‘हे’ 5 खेळाडू मुंबईला करू शकतात चारीमुंड्या चीत, शेवटचे नाव अत्यंत महत्वाचे । MI Vs CSK IPL 2024
– काय सांगता, रोहित शर्मा बनला चक्क बस ड्रायव्हर! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल
– अंगावर काटे आणणाऱ्या सामन्यात राजस्थानचा पंजाबवर 3 गडी राखून विजय