भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे सिडनी येथे शुक्रवारी(27 नोव्हेंबर) पहिला वनडे सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ऍडम गिलख्रिस्टची समालोचन करताना एक मोठी चूक झाली होती. त्यानंतर एका चाहत्यांने जेव्हा याबद्दल ट्विटरवर सांगितले तेव्हा गिलख्रिस्टने या चुकीसाठी ट्विटररुन माफी मागितली.
काही दिवसांपूर्वी मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते. परंतु, समालोचन करताना गिलख्रिस्ट चुकून म्हणाला की नवदीप सैनीच्या वडिलांचे निधन झाले होते. या चुकीनंतर चाहत्यांनी गिलख्रिस्टच्या त्या समालोचनाचा भाग असणारा व्हिडिओ ट्विटर व्हायरल केला. चूकीची जाणीव होताच गिलख्रिस्टने पटकन ट्विटरवर जाऊन आपली चूक मान्य केली आणि माफी मागितली. या दरम्यान गिलख्रिस्टने मोहम्मद सिराजच्या वडिलांना श्रद्धांजलीही वाहिली.
ऍडम गिलख्रिस्टने दोनदा मागितली माफी
सर्वात पहिल्यांदा गिलख्रिस्टच्या चुकीबद्दल एका चाहत्याने ट्विटवर सांगितले, तेव्हा गिलख्रिस्ट म्हणाला की “माझ्याकडून चूक झाली आहे, याबद्दल मी माफी मागतो. मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी या दोघांची माफी मागतो.”
Yes, thanks @anshu2912 I realize I was mistaken in my mention. Huge apologies for my error, to both @navdeepsaini96 and Mohammed Siraj. 🙏😌 https://t.co/618EUIEyNU
— Adam Gilchrist (@gilly381) November 27, 2020
यानंतर मिचेल मॅक्लेनेघनच्या एका ट्विटचे उत्तर देताना ही गिलख्रिस्ट म्हणाला की, माफी मागतो. मॅक्लेनेघनने जेव्हा सांगितले की, नवदीप सैनीच्या नाही मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते. यावर गिलख्रिस्ट म्हणाला “मी पुन्हा सर्वांची माफी मागतो.’
Yep, thanks @Mitch_Savage My huge apologies again to all. https://t.co/F8rYsD6fxm
— Adam Gilchrist (@gilly381) November 27, 2020
पहिल्या वनडेत भारताचा पराभव
ऑस्ट्रेलियाने सिडनीत भारताविरुद्ध पहिल्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना 6 गड्यांच्या मोबदल्यात 374 धावसंख्या उभारली होती. प्रतिउत्तरादाखल भारताला 50 षटकात 308 धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
“…तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात”, विराटने घेतला भारतीय खेळाडूंचा समाचार
श्रीशांतचे मैदानावर पुनरागमन! ‘या’ टी-२० स्पर्धेत घेणार सहभाग
बेयरस्टोचे तुफानी अर्धशतक; इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात दणदणीत विजय
ट्रेंडिंग लेख –
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला
भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके
आयपीएलमध्ये धावांसाठी वणवण करणारे ३ ऑस्ट्रेलियन भारताविरुद्ध पहिल्या वनडेत ‘सुपरहिट’