---Advertisement---

बेयरस्टोचे तुफानी अर्धशतक; इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात दणदणीत विजय

On: शनिवार, नोव्हेंबर 28, 2020 11:05 AM
---Advertisement---

इंग्लंड क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात होणाऱ्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (27 नोव्हेंबर) केप टाऊन येथे खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर टेम्बा बऊमा पहिल्याच षटकांत अवघ्या 6 धावा करून बाद झाला. पण त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि फाफ डू प्लेसिस या आजी-माजी कर्णधारांच्या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करत संघाला भक्कम स्थितीत उभे केले. 10 व्या षटकात क्विंटन डिकॉक माघारी परतला. त्याने 23 चेंडूत 30 धावा केल्या.

डू प्लेसिसने ठोकले अर्धशतक

फाफ डू प्लेसिसने संयमी खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. त्याने सर्वाधिक 58 धावा केल्या. रस्सी वॅन डर दसेन (37 धावा) आणि क्लासेन यांनी अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 179 धावा केल्या

पॉवरप्लेमध्येच इंग्लंडने गमावले 3 बळी

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडची सुरुवातही चांगली झाली नाही. सलामीवीर जेसन रॉय याला डावखुरा फिरकीपटू लिंडे याने पहिल्याच षटकात बाद केले. तो शून्यावर बाद झाला. स्टार फलंदाज जॉस बटलरही अवघ्या 7 धावा करुन तंबूत परतला. यानंतर जॉनी बेयरस्टो आणि डेविड मलान यांनी इंग्लंडचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण डावाच्या 6 व्या षटकात लिंडेने ही भागीदारी मोडली. मलान 19 धावा करून बाद झाला.

बेयरस्टो-स्टोक्स यांनी सावरला डाव

पॉवरप्लेमध्ये तीन गडी गमावल्यानंतर इंग्लंड संघ अडचणीत सापडला, पण त्यानंतर जॉनी बेयरस्टो आणि अष्टपैलू बेन स्टोक्सने तुफानी खेळी करत इंग्लंडला विजयी मार्गांवर नेले. बेयरस्टो आणि स्टोक्स यांनी चौथ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. दोघांनी अवघ्या 31 चेंडूत 50 धावा जोडल्या. इंग्लंडची धावसंख्या 12.2 षटकांत 100 होती. ही भागीदारी 15 व्या षटकात फिरकीपटू तब्राईझ शम्सीने मोडली. स्टोक्स 37 धावांवर बाद झाला.

बेयरस्टोने केले तुफानी अर्धशतक

स्टोक्स बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी इंग्लंडवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण बेअरस्टो आणि कर्णधार ओयन मॉर्गनने त्यांची ही रणनीती मोडून काढली. बेयरस्टोने 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच शेवटच्या काही षटकात त्याने आक्रमक खेळ केला. त्याने 48 चेंडून नाबाद 86 धावा केल्या आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

इंग्लंडने 5 गडी राखून मिळवला विजय

डावाच्या 17 व्या षटकात मॉर्गन आणि बेयरस्टोने ब्युरन हेन्ड्रिक्सच्या गोलंदाजीवर 28 धावा ठोकल्या.इंग्लंडला विजयासाठी अंतिम षटकात 7 धावांची आवश्यकता होती. बेयरस्टोने पहिल्या दोन चेंडूवर चौकार आणि षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके

‘आम्हाला **** फरक पडत नाही’, भारतीय दिग्गजाने घेतला पाकिस्तानी पत्रकाराचा समाचार

Video – भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेदरम्यान डेविड वॉर्नरचे साऊथ इंडियन गाण्यावर थिरकले पाय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---