---Advertisement---

ऍडम गिलख्रिस्टने एमएस धोनीला दिला हा खास संदेश

---Advertisement---

बुधवारी(10 जूलै) 2019 विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध भारताला 18 धावांनी पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.

या पराभवानंतर भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या निवृत्तीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्टचाही समावेश आहे. त्याने धोनीसाठी ट्विट करताना धोनीच्या शांत स्वभावाचेही कौतुक केले आहे.

गिलख्रिस्टने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘तू पुढे खेळणार की नाही, हे माहित नाही. पण धोनी तू या खेळाला खूप काही दिले आहेस. तूझ्या शांत स्वभावाचे आणि आत्मविश्वासाचे नेहमीच कौतुक आहे.’

याबरोबरच गिलख्रिस्टने न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या पराभवानंतर भारतीय चाहत्यांना कठोर होऊ नका असा संदेश देणाराही ट्विट केला आहे.

त्याने या ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘भारतीय संघाच्या चाहत्यांनी तूमचा संघ विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरला म्हणून कठोर होऊ नका. विश्वचषकामध्ये जिंकणे सोपे नाही. बऱ्याच गोष्टी बरोबर होणे आवश्यक असते आणि एक चूकही महागात पडू शकते. भारतीय संघ अव्वल दर्जाचा संघ आहे आणि ते ज्याप्रकारे क्रिकेट खेळतात, ते पहाणे मस्त आहे.’

न्यूझीलंडने भारताविरुद्ध या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 50 षटकात 240 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची आवस्था 6 बाद 92 धावा अशी होती.

परंतू या परिस्थितीतून भारताला सावरताना धोनी आणि रविंद्र जडेजाने सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी रचली. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. मात्र हे दोघेही महत्त्वाच्या क्षणी लागोपाठच्या षटकात बाद झाले. जडेजाने 77 धावांची खेळी तर धोनीने 50 धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर भारताचा डाव 49.3 षटकात सर्वबाद 221 धावांवर संपूष्टात आला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

इतिहासात: आम्ही आलोय.. भारताचा क्रिकेटजगताला संदेश..

टेनिसप्रेमींना विठ्ठलाचे रूप पाहिल्याचे सुख देणारा सामना!!

…म्हणून स्टिव्ह स्मिथच्या रनआऊटचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment