इंग्लंडचा अव्वल गोलंदाज आदिल रशीदनं वनडे क्रिकेटमध्ये एका नवा इतिहास रचला आहे. तो इंग्लंडसाठी या फॉरमॅटमध्ये 200 विकेट घेणारा पहिला फिरकीपटू बनला. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हा टप्पा गाठलं.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आदिल रशीदनं ग्लेन मॅक्सवेलची (7) विकेट घेतली. ही त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील 200वी विकेट होती. विशेष म्हणजे, आदिल रशीद शिवाय इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अद्याप एकाही फिरकीपटूनं 125 विकेटचा टप्पाही गाठलेला नाही. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मोईन अलीनं 111 बळी घेतले असून, ग्रॅमी स्वानच्या नावे 104 विकेट आहेत.
36 वर्षीय आदिल रशीदनं 2009 मध्ये इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तो 5 एकदिवसीय सामने खेळला, मात्र त्यानंतर त्याला जवळपास 6 वर्ष वाट पाहावी लागली. 2015 मध्ये कमबॅक केल्यानंतर तो या फॉरमॅटमध्ये इंग्लंडचा नियमित गोलंदाज बनला. यानंतर त्याची मोईन अलीसोबत जोडी जमली. या दोघांनी इंग्लंडला 2019 विश्वचषक आणि 2022 टी20 विश्वचषक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
आदिल रशीदनं इंग्लंडसाठी आतापर्यंत 136 एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये त्यानं 32.34 ची सरासरी आणि 5.64 च्या इकॉनॉमी रेटनं 200 विकेट घेतल्या आहेत. 27 धावा देऊन 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय त्यानं इंग्लंडसाठी 19 कसोटीत 60 आणि 116 विकेट टी20 मध्ये 122 विकेट घेतल्या आहेत. तो सध्या गोलंदाजांच्या आयसीसी टी20 रँगिंकमध्ये पहिल्या स्थानावर आहे.
हेही वाचा –
राशिद खानची वाढदिवशी मोठी कामगिरी! वनडे क्रिकेटमध्ये असं प्रथमच घडलं
मस्ती नाही थांबली पाहिजे..! कसोटी सामन्यादरम्यान विराटची पंच रिचर्डसोबत मस्ती- Video
भारत विजयापासून 6 विकेट दूर, बांगलादेशला चमत्काराची आवश्यकता; तिसऱ्या दिवसाचा हाल जाणून घ्या