पुणे। बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुल्या फिडे क्लासिकल रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या फेरीत गुजरातच्या अनादकत कर्तव्या, पुण्याच्या फिडे मास्टर आदित्य सामंत या खेळाडूंनी 6.5 गुणांसह आघाडी कायम राखली आहे.
अश्वमेध हॉल, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सातव्या फेरीत गुजरातच्या काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या अनादकत कर्तव्याने नागपूरच्या फिडे मास्टर सौरव खेर्डेकरला बरोबरीत रोखले व 6.5 गुणांची कमाई केली. तर, पुण्याच्या फिडे मास्टर आदित्य सामंतने महिला ग्रँड मास्टर स्वाती घाटेचा पराभव करून 6.5 गुणांसह आपली आघाडी कायम राखली. रेल्वेच्या विक्रमादित्य कुलकर्णीने प्रियांशु पाटीलविरुद्ध 6 गुण मिळवले. याशिवाय महाराष्ट्राच्या अक्षय बोरगावकर, पियुश नर्सिकर, गुजरातच्या विश्रुत पारेख या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून 6 गुण प्राप्त केले.
सविस्तर निकाल:
सातवी फेरी: व्हाईट व ब्लॅक नुसार:
एफएम सौरव खेर्डेकर(महाराष्ट्र)(6गुण)बरोबरी वि.अनादकत कर्तव्या(गुजरात)(6.5गुण);
डब्लूजीएम स्वाती घाटे(एलआयसी)(5.5गुण)पराभूत वि.एफएम आदित्य सामंत(महाराष्ट्र)(6.5गुण);
आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(रेल्वे)(6गुण)वि.वि.प्रियांशु पाटील(महाराष्ट्र)(5गुण);
जयववीर महेंद्रु(महाराष्ट्र)(5.5गुण)बरोबरी वि.करण त्रिवेदी(गुजरात)(5.5गुण);
अक्षय बोरगावकर(महाराष्ट्र)(6गुण)वि.वि.देवम मकवाना(गुजरात)(5गुण);
ओम लामकाने(महाराष्ट्र)(5गुण)पराभूत वि.पियुश नर्सिकर(महाराष्ट्र)(6गुण);
विवान शहा(गुजरात)(5गुण)पराभूत वि.विश्रुत पारेख(गुजरात)(6गुण);
गौरव बाकलीवाल(महाराष्ट्र)(5.5गुण)वि.वि.धीरेन मोर(महाराष्ट्र)(5गुण);
सौरभ मेहमाणे(महाराष्ट्र)(5.5गुण)वि.वि.सिद्धांत गायकवाड(महाराष्ट्र)(4.5गुण);
सेरा डागरिया(मध्यप्रदेश)(4.5गुण)पराभूत वि.अंकित चुडासामा(गुजरात)(5.5गुण);
रियान शहा(महाराष्ट्र)(5.5गुण)वि.वि.एजीएम चंद्रजीत सिंगराजवत(राजस्थान)(4.5गुण);
सोहम पवार(महाराष्ट्र)(5गुण)बरोबरी वि.चिन्मय केळसकर(महाराष्ट्र)(5गुण);
अनिश गोडसे(महाराष्ट्र)(5गुण)बरोबरी वि.हेरंब भागवत(महाराष्ट्र)(5गुण);
योहान बोरीचा(महाराष्ट्र)(5गुण)बरोबरी वि.अमन बालना(राजस्थान)(5गुण);
वैभव बोरसे(महाराष्ट्र)(5गुण)बरोबरी वि.अर्जुन बालामुरली(युएसए)(5गुण).