पुणे (14 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आज ‘ब’ गटातील लढतीचा तिसरा दिवस तर स्पर्धेचा दहावा दिवस होता. नंदुरबार संघाने सलग तिसरा विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. तर सांगली, कोल्हापूर व नाशिक संघांनी दुसरा विजय मिळवला.
आज झालेल्या पहिल्या सामन्यात सांगली संघाने पालघर संघावर मात देत स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला. सांगली संघाने सुरुवातीलाच आक्रमक खेळ करत पालघर संघाला ऑल आऊट केले. मध्यंतरा नंतरही सांगली ने आक्रमकता दाखवत 35-26 असा विजय मिळवला. सांगलीचा अभिषेक गुंगे विजयाचा शिल्पकार ठरला. तर आजच्या दुसऱ्या सामन्यात नाशिक संघाने लातूर संघाचा 68-22 असा धुव्वा उडवला. नाशिक कडून पवन भोर ने 17 गुणांची महत्वपूर्ण खेळी केली तर ईश्वर पथाडे ने अष्टपैलू खेळीचे प्रदर्शन केले.
कोल्हापूर संघाने सातारा संघाचा 47-24 असा पराभव करत स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला. कोल्हापूर कडून ओमकार पाटील ने सर्वाधिक गुण मिळवले. तर दादासो पुजारीने 6 पकडी करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. आजच्या चौथ्या सामन्यात नंदुरबार संघाने 42-19 असा एकतर्फी विजय मिळवला. तिसऱ्या विजयासह नंदुरबार संघाने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. नंदुरबारच्या जयेश महाजन ने अष्टपैलू खेळी केली. (Advancement of Nandurbar, Sangli, Kolhapur and Nashik teams)
संक्षिप्त निकाल:-
सांगली जिल्हा 35 – पालघर जिल्हा 26
लातूर जिल्हा 22 – नाशिक जिल्हा 68
सातारा जिल्हा 24 – कोल्हापूर जिल्हा 47
धाराशिव जिल्हा 19 – नंदुरबार जिल्हा 42
महत्वाच्या बातम्या –
सांगली संघाने पालघर संघाचा विजयी रथ रोखला
युवा कबड्डी सिरीज मध्ये कोल्हापूर संघाचा दुसरा विजय