---Advertisement---

नवीनला सुट्टी नाही! पहिल्या वर्ल्डकप सामन्यापासून फॅन्सकडून त्रास सुरू, मैदानात ‘विराट-विराट’च्या घोषणा

On: शनिवार, ऑक्टोबर 7, 2023 5:08 PM
'Kohli, Kohli' chants at Dharamshala Stadium in front of Naveen Ul Haq
---Advertisement---

विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात झालेला वाद चाहते अद्याप विसरले नाहीत, असेच दिसते. वनडे विश्वचषक 2023 खेळण्यासाठी नवीन उल हक अफगाणिस्तान संघासोबत भारतात आला आहे. शनिवारी (7 ऑक्टोबर) अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान, नवीनला डिवचण्याचा प्रयत्न मैदानात उपस्थित चाहत्यांकडून झाला. बांगलादेशने हा सामना 6 विकेट्स राखून जिंकला.

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाला आपल्या वाटाचे 50 षटकेही खेळून काढता आली नाहीत. अवघ्या 37.2 षटकात अफगाणिस्तान संघ 156 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात बांगलादेशने हे लक्ष्य 34.4 षटकात 4 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. मेहंदी हसन मिराझ (Mehidy Hasan Miraz) सामनावीर ठरला, ज्याने संघासाठी तीन विकेट्स घेतल्या आणि अर्धशतक देखील केले.

दरम्यान, बांगलादेशच्या फलंदाजीवेळी अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक (New Ul Haq) श्रेत्ररक्षणासाठी मैदानात आला होता. सीमारेषेजवळ उभा असलेल्या नवीनला पाहून चाहत्यांनी ‘विराट-विराट’ अशा घोषणा सुरू केल्या. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवीनसाठी हा कारकिर्दीतील शेवटचा वनडे विश्वचषक असणार आहे. वर्कलोडच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. विश्वचषकानंतर तो वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. दरम्यान, विराट कोहली (Virat Kohli) आणि नवीन उल हक यांच्यातील हा वाद इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये पाहायला मिळाला होता. विराटचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि नवीन प्रतिनिधित्व करत असलेल्या लखनऊ सुवर जायंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान विराट आणि नवीन आमने सामने आले होते. यावेळी भारतीय दिग्गज गौतम गंभीर देखील विराटसोबत वाद घालताना दिसला होता. (‘Kohli, Kohli’ chants at Dharamshala Stadium in front of Naveen Ul Haq)

बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यासाठी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हन – 
बांगलादेश – लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, मेहदी हसन मिराझ, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तौहीद हृदोय, महमुदुल्ला, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिझूर रहमान.

अफगाणिस्तान – रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

महत्वाच्या बातम्या – 
World Cup 2023: अफगाणिस्तानने टेकले बांगलादेशसमोर गुडघे, मेहिदी हसनची अष्टपैलू कामगिरी 
कुस्तीमध्ये भारताला रौप्यपदक, सुवर्णअक्षरात लिहिला जाणार 7 ऑक्टोबरचा दिवस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---