बुधवारी (३ नोव्हेंबर) भारत विरुद्ध अफगानिस्तान या दोन्ही संघांमध्ये अबु धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर रोमांचक सामना पार पडला. फलंदाजी, गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षण या तिन्हीही विभागात प्रशंसनीय प्रदर्शन करत भारतीय संघाने त्यांच्या विजयाचे खाते उघडले. त्यांनी ४४ धावांनी हा सामना खिशात घातला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने केवळ १ विकेटचे योगदान दिले. मात्र या सामन्यात हुबेहूब जसप्रीत बुमराहसारखी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडिओमध्ये अफगानिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक गोलंदाजी करताना दिसून येत आहे. आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय? विशेष असे तर हा गोलंदाज हुबेहूब जसप्रीत बुमराहसारख्या ॲक्शनने गोलंदाजी करताना दिसून येत आहे.
आयसीसीने भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना जसप्रीत बुमराह ज्यावेळी गोलंदाजी करण्यासाठी आला होता, त्यावेळचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एकीकडे जसप्रीत बुमराह गोलंदाजी करतोय. तर दुसरीकडे नवीन उल हक गोलंदाजी करतोय. हा व्हिडिओ जेव्हा स्क्रीनवर दाखवण्यात आला त्यावेळी नवीन उल हकने दिलेली रिॲक्शन पाहण्यासारखी होती. या व्हिडिओला कॅप्शन देत, आयसीसीने “एकसारखे आहेत पण आहेत वेगळे,” असे लिहिले आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीचा ठरत असून चाहते देखील या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.
https://www.instagram.com/reel/CV19oZrlZ85/?utm_medium=copy_link
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात अफगानिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माने सर्वाधिक ७४ तर केएल राहुलने ६९ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर २ बाद २१० धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना अफगानिस्तान संघाकडून करीम जनतने नाबाद ४२ तर मोहम्मद नबीने ३५ धावांचे योगदान दिले. हा सामना भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीनंतर ‘या’ खेळाडूला करावे भारतीय संघाचा कर्णधार, दिनेश कार्तिकने दिला सल्ला
झम्पाच्या फिरकीची जादू! बांगलादेशविरुद्ध विकेट्सचे ‘पंचक’ पूर्ण करत तब्बल ४ मोठ्या विक्रमांना गवसणी