सध्या तालिबानने संपूर्ण अफगाणिस्थान काबीज केले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती खूप नाजूक चालू आहे. तालिबानच्या या अधिकारामुळे तिथल्या महिला क्रिकेटपटूंवर देखील याचा परिणाम झाला आहे. त्यातीलच एक म्हणजे, अफगाणिस्तानची महिला क्रिकेटर रोया शमीन. शमीम सध्या तालिबानच्या अधिकारानंतर आपल्या २ बहिणींसह अफगाणिस्थान सोडून कॅनडाला गेली आहे.
तिने या त्रासदीमुळे आपला देश सोडावा लागला याचे देखील दुःख व्यक्त केले. मात्र, या दरम्यान तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदवर (आयसीसी) एक मोठे वक्तव्य केले आहे.
सध्या कॅनडामध्ये असलेल्या रोया शमीने सांगितले की, “तालिबान हा मुलींच्या शिकण्याच्या खूप विरोधात आहे. अशाच तो मुलींना क्रिकेट खेळायला कशी परवानगी देईल? अफगाणिस्तान सोडून जाणे माझ्यासाठी खूप दुःखदायी होते. त्यादिवशी मी फक्त रडत होते. मला तिथल्या प्रत्येक गोष्टीशी जवळीक होती. माझी नोकरी, माझे क्रिकेट, माझे सहकारी, माझे घर आणि माझे सहसंबंधी माझ्याजवळ जे काय होते, ते मी मागे सोडून दिले. आजही जेव्हा मला तो दिवस आठवतो तेव्हा मला अश्रू अनावर होतात.”
यादरम्यान रोया शमीमने तिच्या या परिस्थितीवर आयसीसीला देखील मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे सांगितले. यावर ती म्हणाली, “आम्ही सर्वांनी आयसीसीला इमेल केला होता. मात्र, त्यांच्याकडून काहीही उत्तर आले नाही. ते आम्हाला उत्तर का देत नाहीत? ते आम्हाला का मानत नाहीत? त्याचबरोबर आमच्या सोबत असे वागवले जाते की आम्ही या जगातच नाही आहोत. तालिबानने काबुल काबीज केल्यानंतर आम्ही आयसीसीला विनंती केली होती की कृपया सर्व मुलींना वाचवावे. आम्ही आमच्या सहकाऱ्यांना घेऊन चिंतित होतो. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील यावर काही कृती केली नाही. ते आम्हाला फक्त म्हणाले, थांबा!”
दरम्यान, तालिबानच्या अफगाणिस्तानवरील अधिकारानंतर पुरुषांच्या क्रिकेटवरदेखील प्रश्नचिन्ह होते. मात्र यावेळी तालिबानच्या मोठ्या नेत्यांनी क्रिकेटला संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर करत, सर्व सामने नियमित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे देखील सांगितले. असे असले तरी, आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ हजेरी लावू शकेल की, नाही याकडे सर्वांचे लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या –
–ठाकूर तुला मानलं! अवघ्या ३१ चेंडूंमध्ये अर्धशतक करत शार्दुलने इंग्लंडमध्ये रचला इतिहास
–जिद्दीला सलाम! गुडघा रक्तबंबाळ झाल्यानंतरही अँडरसनने दाखवले खेळण्याचे धाडस, फोटो व्हायरल
–तेंडुलकरनंतर आता पुजारा ठरतोय जेम्स अँडरसनचा नेहमीचा गिऱ्हाईक, ‘इतक्या’ वेळेस केलंय बाद