आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) टी20 विश्वचषकाचे आयोजन 17 ऑक्टोंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये केले गेले आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अष्टपैलू राशिद खान याची टी20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. तर फलंदाज नजीबुल्लाह जादरान याच्याकडे उपकर्णधारपद दिले आहे.
अफघानिस्तान क्रिकेट बोर्डाने एक अहवाल सादर केला आहे. त्या अहवालामध्ये सांगितले की, ‘क्रिकेट जगतामध्ये प्रसिद्ध असलेल्या राशिद खानची अफघानिस्तान टी20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. त्याची निवड एसीबी अध्यक्ष फरहान यूसेफजई यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे. एसीबीच्या नेतृत्वकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राशिदचा अनुभव, त्याची उत्कृष्ट कामगिरी आणि नेतृत्व करण्याचे कौशल्य पाहिले असल्यामुळे त्याला हे पद देण्यात आले आहे’
आयसीसीच्या टी20 क्रमवारीतील गोलंदाजाच्या यादीमध्ये राशिद खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु यापूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व करण्यास नकार दिला होता. राशिदला असे वाटत होते की, तो संघाचे नेतृत्व करण्यापेक्षा संघात एक खेळाडू म्हणून अधिक उपयोगी ठरेल. परंतु आता त्याने ही जबाबदारी स्विकारण्याचे ठरवले आहे.
या अगोदर राशिदची जुलै 2019 मध्ये तिन्ही क्रिकेट स्वरूपातील संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. परंतु वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकमेव कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत अफगाणिस्तान संघाचा पराभव झाल्यामुळे डिसेंबरमध्ये असगर अफगानला कर्णधारपद देण्यात आले होते.
टी20 विश्वचषक 2021 च्या ग्रुप बीमध्ये अफगाणिस्तानचा इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघासह यादीत समावेश आहे. उर्वरित दोन संघांची निवड पात्रता फेरी सामन्यांंद्वारे केली जाणार आहे. कोरोना व्हायरस महामारीच्या प्रादुर्भावामुळे भारतामध्ये आयोजित होणारा टी20 विश्वचषक 2021, काही दिवसांपूर्वीच भारतामधून युएई आणि ओमानमध्ये घेण्याचे निश्चित केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एमएस धोनीचे कर्णधार म्हणून घेतलेले खतरनाक ३ निर्णय, ज्यांनी सामना एकहाती फिरवला
निष्काळजीपणाने वाढवली चिंता! इंग्लंडच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव, तरीही विराटसेनेच्या सुट्ट्या सुरूच
अशा ५ घटना, ज्यामुळे धोनीने जिंकलं क्रिकेटप्रेमींचं मनं