अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान शारजा येथे तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (26 मार्च) खेळला गेला. अफगाणिस्तानने सलग दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा धक्का देत ऐतिहासिक मालिका विजय साजरा केला. अफगाणिस्तानने पाकिस्ता विरुद्ध कोणत्याही प्रकारच्या मालिकेत नोंदवलेला हा पहिलाच विजय ठरला.
https://twitter.com/ICC/status/1640118601708367873?t=G4NnqE4X2ziXTpnXoBzsXA&s=19
शारजा येथे झालेल्या या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्याचे लक्ष पाकिस्तान संघाचे होते. पाकिस्तानचा कर्णधार शादाब खान याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, फझलहक फारुखी याने पहिल्याच षटकात दोन धक्के देत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. यानंतर पाकिस्तानचा संघ सामन्यात पुनरागमन करू शकला नाही. इमाद वसीमने अखेरपर्यंत नाबाद राहत 64 धावांची खेळी केली. मात्र, यासाठी त्याने तब्बल 57 चेंडू घेतले. शादाबने 32 धावांचे योगदान दिले.
सामना आणि मालिका जिंकण्यासाठी मिळालेल्या 131 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने आपला पहिला बळी 30 धावांवर गमावला. मात्र, गुरबाज व इब्राहीम झादरान यांनी संघाची पार पडझड होऊ न देता अर्धशतकी भागीदारी केली. त्यांनी अनुक्रमे 44 व 38 धावा केल्या. त्यानंतर नजीब झादरानने 23 व नबीने 14 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. मालिकेतील पहिल्या सामन्यातही अफगाणिस्तानने 6 गडी राखून पाकिस्तानला पराभूत केलेले.
अफगाणिस्तानने आता आयर्लंड, बांगलादेश व श्रीलंका यांच्यानंतर पाकिस्तानला देखील पराभूत करण्याची किमया केली आहे. राशिद खान याच्या नेतृत्वातील अफगाणिस्तान संघाला आगामी काळात मोठे भवितव्य असल्याचे सांगितले जाते. मागील वर्षी आशिया चषकात देखील त्यांनी भारत व पाकिस्तान यांना घाम फोडलेला.
(Afghanistan Beat Pakistan In Sharjah T20I By 7 Wickets Afghanistan Seal Historic Series Win)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फक्त 44 चेंडूत टी20 क्रिकेटमध्ये शतक! क्विंटन डी कॉकसह दक्षिण आफ्रिकी संघ फायद्यात
ब्रेकिंग! बीसीसीआयकडून 2022-23 हंगामासाठी करारबद्ध केलेल्या 26 खेळाडूंची यादी जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळणार 7 कोटी






