---Advertisement---

विश्वचषकात अफगाणिस्तानची धमाल! एका वर्षात 4 मोठ्या संघांना पाजलंय पाणी

---Advertisement---

2024 टी20 विश्वचषकात सातत्यानं अपसेट पाहायला मिळत आहेत. शनिवारी अफगाणिस्ताननं एकतर्फी सामन्यात न्यूझीलंडचा 84 धावांनी पराभव केला. अफगाणिस्ताननं आपल्या कामगिरीनं दाखवून दिलं आहे की ते स्पर्धेतील कोणत्याही संघाला पराभूत करू शकतात. अशा स्थितीत विश्वचषकातील सर्व संघांना त्यांच्याविरुद्ध सावध राहावं लागेल.

खरं तर, अफगाणिस्तानचा संघ गेल्या एक वर्षापासून आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. टी20 विश्वचषकापूर्वी त्यांनी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातही 3 मोठ्या संघांना पराभूत केलं होतं. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अफगाणिस्ताननं विश्वचषक स्पर्धेत केलेल्या 4 मोठ्या अपसेट्सबद्दल सांगणार आहोत.

(4) अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, विश्वचषक 2023
अफगाणिस्ताननं 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात बलाढ्य इंग्लंडविरुद्ध विजय मिळवत मोठा अपसेट केला होता. या सामन्यात अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करत 284 धावा केल्या. प्रत्येकाला वाटत होतं की इंग्लंड हा सामना सहज जिंकेल. परंतु इंग्लिश फलंदाज अफगाणिस्तानच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले आणि संपूर्ण संघ 215 धावांत गारद झाला. या सामन्यात अफगाणिस्ताननं इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला.

(3) अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान, विश्वचषक 2023
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तान संघ जोमात होता. अफगाणिस्ताननं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही आपला उत्साह कायम ठेवला. संघानं पाकिस्तानविरुद्ध बॉल आणि बॅटनं चमकदार कामगिरी करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 50 षटकात 282/7 धावा केल्या. प्रत्युत्तरात, अफगाणिस्ताननं हे लक्ष्य 49 षटकांत 2 गडी एकतर्फी गाठलं.

(2) अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, विश्वचषक 2023
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना 241 धावा केल्या होत्या. या सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत 45.2 षटकात 242/3 धावा करत लक्ष्य गाठलं.

(1) अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, टी20 विश्वचषक 2024
शनिवारी (8 जून) झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 159/6 धावा केल्या. किवी संघ हा सामना सहज जिंकेल असं वाटत असताना अफगाण गोलंदाजांनी जादू करत न्यूझीलंडचा डाव अवघ्या 75 धावांवर रोखला. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकी आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 4 बळी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंकेचा पराभव होऊनही वानिंदू हसरंगानं रचला इतिहास, लसिथ मलिंगाचा मोठा विक्रम मोडला
टी20 विश्वचषकात आणखी एक अपसेट! अफगाणिस्ताननं केला न्यूझीलंडचा एकतर्फी पराभव
टी20 विश्वचषकात पाहायला मिळाला आणखी एक लो स्कोअरिंग सामना! बांगलादेशचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---