गेल्या वर्षी (६ ऑक्टोबर, २०२०) आजच्या दिवशी क्रिकेट जगताला हादरवून टाकणारी घटना घडली होती. अफगाणिस्तानच्या २९ वर्षीय खेळाडूच्या मृत्यूची बातमी समोर आल्यावर संपूर्ण क्रीडाजगत शोकसागरात बुडाले होते. अफगाणिस्तानचा स्टार फलंदाज नजीब तरकाई याचे निधन झाले होते. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. ही माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर चाहत्यांना दिली होती होती. आज या दु:खद घटनेस १ वर्ष पूर्ण होते आहे. त्यानिमित्ताने अफगाणिस्तान बोर्डाने ट्वीट करत नजीब तरकाईला श्रद्धांजली वाहिली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले होते की, ‘नजीब तरकाईला २ ऑक्टोबर रोजी कार अपघात झाला होता. त्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. नांगरहारमध्ये त्याचे उपचार सुरू होते. त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती, पण त्याचे निधन झाले आहे.’
नजीब तरकाईने अफगाणिस्तानसाठी एक एकदिवसीय आणि १२ टी-२० सामने खेळले होते. त्याने शापेजा प्रीमियर लीगमध्ये शेवटचा सामना खेळला होता. २०१७ मध्ये त्याने आयर्लंडविरुद्ध त्याची सर्वोत्तम ९० धावांची खेळी खेळली होती. सप्टेंबर २०१९ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाने आज एक ट्विट करत त्यास श्रद्धांजली देत लिहिले की, ‘एक चांगला व्यक्ती आणि खेळाडू नजीब तारकाई (२९) ज्याने अफगाणिस्तानमध्ये झालेल्या दुःखद रस्ते अपघातात आपला जीव गमावला. त्याने एक एकदिवसीय आणि १२ टी२० सामन्यात अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने प्रामुख्याने सलामीचा फलंदाज म्हणून काम केले होते. २०१७ मध्ये त्याने आयर्लंड विरूद्धच्या टी२० सामन्यात ९० धावांची अप्रतिम खेळी केली होती. ही त्याची त्याची टी२० मधील सर्वोत्तम कामगिरी होती. त्यास भावपूर्ण श्रद्धांजली.’
A very fine human being Najeeb Tarakai (29) who lost his life to tragic traffic accident in Afghanistan, had featured in one ODI and 12 T20Is for Afghanistan, primarily as an opening batsman. His T20I best of 90 came against Ireland in 2017.
May Allah Shower His Mercy on him. pic.twitter.com/n1QGdl4Tnx— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 6, 2021
त्याच्या निधनाच्या बातमीनंतर सर्व क्रिकेट जग शोकात बुडाले होते. भारतीय खेळाडूंसह इतर देशांच्या खेळाडूंनीही त्यास श्रद्धांजली वाहिली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषक तोंडावर, पण त्याआधीचे सराव सामनेही महत्त्वाचे, वेळापत्रक झालंय घोषित; टाका नजर