सोमवारी (दि. 1 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याचा लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या खेळाडूशी वाद झाला. लखनऊचा खेळाडू नवीन-उल-हक आणि मार्गदर्शक गौतम गंभीर यांनी विराटच्या ‘आ रे’ला ‘का रे’ उत्तर दिले. या वादानंतर अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन-उल-हक याने सोशल मीडियावर मोठी प्रतिक्रिया दिली. त्याची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.
नवीनची इंस्टाग्राम स्टोरी
नवीन-उल-हक (Naveen-ul-Haq) याने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “तुम्हाला तेच मिळते, ज्याचे तुम्ही हक्कदार आहात. असेच झाले पाहिजे आणि असेच होत असते.” नवीनची ही स्टोरी सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
नवीनने कुणाकडे केला इशारा?
सामन्यात 4 षटके गोलंदाजी करत 30 धावा खर्च करून 3 विकेट्स घेणाऱ्या नवीन-उल-हक हा सांगू इच्छितो की, मैदानावर जे काही झाले, तू त्याच लायकीचा होता. हा इशारा कुणाकडे आहे? यामार्फत तो विराट कोहलीला उत्तर देत आहे का? सध्या चाहते या स्टोरीचा संबंध थेट विराटशी लावत आहेत. मात्र, नवीनने या स्टोरीमध्ये कुणाचेही नाव घेतले नाहीये. मात्र, काही क्रिकेटप्रेमींना हा नवीनचा हा इशारा कुणाकडे होता, हे कदाचित समजले आहे.
https://twitter.com/mvrkguy/status/1653104060340338688
https://twitter.com/ayush_gupta45/status/1653130038412447744
विराटनेही दिली प्रतिक्रिया
नवीनपूर्वी विराट कोहली (Virat Kohli) यानेही इंस्टाग्राम स्टोरीवर पहिली प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिले की, “आपण जे काही ऐकतो, ते एक मत आहे, तथ्य नाही. आपण जे काही पाहतो, तो एक संदर्भ असतो, सत्य नाही.” निश्चितच विराटचे चाहते या स्टोरीमुळे खूपच उत्साहित दिसले. त्यांनी ही स्टोरी तुफान व्हायरल केली आहे.
नवीन-विराटचे भांडण झाले तरी कसे?
अवघ्या 127 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरेल्या लखनऊ संघाने पॉवरप्लेमध्येच गुडघे टेकले होते. आपल्या संघाचा दबदबा पाहून विराट विरोधी फलंदाजांची मजा घेताना दिसला. यादरम्यान त्याचे नवीन-उल-हक याच्याशी खटके उडाले. विराटने त्यावेळी पायातील बूट दाखवून अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूला प्रत्युत्तर दिले होते. सामना संपल्यानंतर हातमिळवणी करण्यादरम्यानही दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर प्रकरणात गौतम गंभीर यानेही उडी घेतली. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यावर आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सामना शुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला. तसेच, नवीनवर सामना शुल्काच्या 50 टक्के दंड लावला गेला. (afghanistan cricketer naveen ul haq fires back at virat kohli with explosive instagram post ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘विरोधी संघाचा आदर करा…’, विराट आणि गंभीर एकमेकांना भिडताच कुंबळेची मोठी प्रतिक्रिया
आधी भांडण नंतर रिऍक्शन! ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर विराटची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘जर तू बोलला, तर…’