---Advertisement---

धोनी बनत राशिद खानने ठोकला ‘हेलिकॉप्टर शॉट’, व्हिडिओ जोरदार व्हायरल

On: गुरूवार, नोव्हेंबर 26, 2020 8:53 AM
---Advertisement---

अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो दररोज काहीतरी पोस्ट करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. इतर क्रिकेटपटूंप्रमाणे राशिदही माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीचा मोठा चाहता आहे. त्याला अनेकवेळा धोनीचे तोंडभरून कौतुक करताना पाहिले आहे. राशिदने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो धोनीसारखा शॉट मारताना दिसत आहे.

राशिदने शेअर केलेला व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. खरं तर राशिद या व्हिडिओमध्ये धोनीप्रमाणे हेलिकॉप्टर शॉट खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हेलिकॉप्टर अफगाणिस्तानमध्ये उतरले आहे.”

https://www.instagram.com/p/CIAKzAQhPQw/?utm_source=ig_web_copy_link

राशिदच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत तब्बल १० लाख पेक्षा अधिक वेळा पाहण्यात आला आहे.

एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘व्वा! राशिद, धोनी भाईची आठवण आली.’ यानंतर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, ‘हेलिकॉप्टर शॉट मारणे धोनीकडून शिकला आहे का?’

खरंतर राशिद आपल्या गोलंदाजीव्यतिरिक्त चांगली फलंदाजीही करू शकतो. त्याने नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाकडून १६ सामन्यात खेळताना २० विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त त्याने ३५ धावांचेही योगदान दिले. या धावा करताना त्याने ३ चौकार आणि २ षटकार ठोकले.

महत्त्वाच्या बातम्या-

बुमराहने केली जडेजाच्या गोलंदाजी शैलीची हुबेहुब नक्कल, पाहा Video

Video: मोहम्मद शमीच्या भावाची दमदार खेळी; चौकार- षटकारांचा पाऊस पाडत ठोकले अर्धशतक

क्या बात है ! रस्ता चुकलेल्या सचिनचा रिक्षावाल्यासोबत थेट मराठीत संवाद; तो ही म्हणाला, ‘मला फॉलो करा’

ट्रेंडिंग लेख-

ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज

भारतीय संघातील ५ खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत केली आहे दमदार कामगिरी

वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---