रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात एक रोमांचक सामना झाला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली आणि संपूर्ण संघ 147 धावांत ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 19.4 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियाच्या विजयाचा नायक स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या होता, ज्याने प्रथम तीन बळी घेतले आणि नंतर नाबाद 33 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली. हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात चौथ्या चेंडूवर लाँग ऑनला षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
जगभरातील चाहत्यांनी भारताच्या विजयाचा आनंद साजरा केला. भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या चाहत्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर जगभरात गाजत आहेत. मात्र यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अफगाणिस्तानचा आहे. टीम इंडियाच्या विजयाने अफगाणिस्तानचा एक माणूस खूपच उत्साहित झाला होता. तो त्याच्या जागेवरून उठला आणि टीव्ही स्क्रीनवर हार्दिक पांड्याला किस करून रूमच्या बाहेर गेला. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तेरा भाई संभाल लेगा..! दबावाच्या क्षणीही दाखवला आत्मविश्वास, हार्दिकचा स्वॅग पाहून चाहते घायाळ
INDvsPAK: तेच मैदान, तेच विरोधक! चार वर्षापूर्वी स्ट्रेचरवर बाहेर गेलेल्या हार्दिकचे जबरदस्त पुनरागमन
भर सामन्यात पाकिस्तानची जर्सी घालून आला विराटचा जबरा फॅन! आता सोशल मीडियावर घालतोय राडा






