---Advertisement---

भारत आता अफगाणिस्तान भरोसे, नबी अन् संघाला पाकिस्तानविरुद्ध करावं लागेल ‘हे’ काम

On: बुधवार, सप्टेंबर 7, 2022 10:46 AM
India-Pakistan-Afghanistan
---Advertisement---

आशिया चषक 2022 च्या सुपर-4 फेरीतील 3 सामने आतापर्यंत पार पडले आहेत. यातील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानला 4 विकेट्सने मात दिली होती. तर पुढील दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंकेने भारताचा पराभव केला आहे. या सलग दोन पराभवांनंतर भारतीय संघाचे अंतिम सामन्यात पोहोचणे कठीण झाले आहे. मात्र अफगाणिस्तानचा संघ भारतासाठी अंतिम सामन्याचा मार्ग उघडा करू शकतो. ते कसे?, जाणून घेऊ…

साखळी फेरीतील सलग 2 सामने जिंकत भारतीय संघाने सुपर-4 फेरीत प्रवेश केला होता. परंतु सुपर- 4 फेरीत भारतीय संघाला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. त्यांनी पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना 1 चेंडू शिल्लक असताना 5 विकेट्सने जिंकला. या पराभवानंतर भारतीय संघाला पुढील सामन्यात श्रीलंकेला पराभूत करणे अत्यंत आवश्यक होते. कारण भारताने जर श्रीलंकेला हरवले असते, तर त्यांच्या खात्यात 2 गुण जमा झाले आहे. ज्यानंतर भारतापुढे फक्त अफगाणिस्तानला पराभूत करण्याचे आवाहन राहिले असते.

परंतु श्रीलंकेविरुद्धच्या ‘करा वा मरा’ सामन्यातही भारताला 6 विकेट्सने पराभव पाहावा लागला. यामुळे आता भारतीय संघापुढे एक शेवटची संधी शिल्लक आहे. बुधवारी (07 सप्टेंबर) शारजाहमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघात आमना सामना होणार आहे. जर अफगाणिस्तानने या सामन्यात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली, तर भारतासाठी अंतिम सामन्याच्या अपेक्षा पल्लवित होतील.

भारतासाठी पाकिस्तानचा पराभव गरजेचा
श्रीलंकेच्या संघाने भारत आणि अफगाणिस्तानला पराभूत करत सर्वात आधी अंतिम सामन्यात जागा बनवली आहे. तर पाकिस्तान संघालाही (Afghanistan vs Pakistan) सुपर-4 मध्ये एक विजय मिळाला आहे. अशात बुधवारी जर पाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत केले, तर ते अंतिम सामन्यात पोहोचतील आणि भारत आशिया चषकातून बाहेर होईल. याउलट जर अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवले, तर भारताचे स्पर्धेतील आव्हान टिकून राहील.

यानंतर भारताला फक्त अफगाणिस्तानविरुद्धचा शेवटचा सुपर-4 सामना जिंकावा लागेल. तसेच श्रीलंका संघानेही त्यांच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करावे लागेल. असे झाल्यास नेट रन रेटच्या जोरावर पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा भारत अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार रोहितच्या ‘या’ निर्णयामुळे हारली इंडिया! पाकिस्तानचा घाम फोडणाऱ्या गोलंदाजालाच केले बाहेर
भर मैदानात रोहितने अर्शदीपला दिली अशी वागणूक की चाहते म्हणाले, बाहेर करा या गर्विष्ठ कर्णधाराला!
टी20 वर्ल्डकपसाठी नेदरलँड्स संघाची घोषणा; दक्षिण आफ्रिका-इंग्लंडमध्ये खेळलेल्या या तगड्या खेळाडूंना संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---