आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 42वा सामना शुक्रवारी (दि. 10 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला जाणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात अफगाणिस्तान संघात कोणताही बदल नाहीये. दुसरीकडे, टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याच्या नेतृत्वातील दक्षिण आफ्रिका संघात दोन बदल आहेत. तबरेज शम्सी आणि मार्को यान्सेन यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच, त्यांच्या जागी अँडिले फेहलुक्वायो आणि गेराल्ड कोएट्जी यांना सामील केले आहे.
स्पर्धेतील कामगिरी
उभय संघांची विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर दक्षिण आफ्रिका संघ चांगल्या स्थितीत आहे. त्यांनी आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यात त्यांना 6 सामने जिंकण्यात यश आले आहे, तर उर्वरित 2 सामन्यांवर पाणी सोडावे लागले आहे. यासह 12 गुणांसह ते पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. विशेष म्हणजे, ते विश्वचषक 2023 उपांत्य फेरीसाठी पात्रही ठरले आहेत. अशात हा सामना त्यांच्यासाठी औपचारिक असणार आहे.
दुसरीकडे, अफगाणिस्तान संघानेही 8 सामने खेळले आहेत. त्यात त्यांना 4 सामन्यात विजय, तर 4 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. ते 8 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहेत. अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवत स्पर्धेतील विजयाचे पंचक पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. (Afghanistan have won the toss and have opted to bat against South Africa CWC 23)
विश्वचषक 2023च्या 42व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, अँडिले फेहलुक्वायो, डेविड मिलर, गेराल्ड कोएट्जी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी
अफगाणिस्तान
रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान, इकराम अलिखिल (यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक
हेही वाचा-
सेहवागच्या पोस्टने सोशल मीडियावर माजवली खळबळ; म्हणाला, ‘पाकिस्तान जिंदा…’
आजोळच्या घरी पोहोचताच आजीने काढली रचिन रवींद्रची दृष्ट, व्हिडिओ जिंकतोय सर्वांची मने