---Advertisement---

तोंडचा घास हिरावताच अफगाणी कर्णधाराची सर्वात मोठी प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाला, ‘मॅक्सवेल थांबलाच नाही…’

Hashmatullah-Shahidi-Glenn-Maxwell
---Advertisement---

मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) अफगाणिस्तान संघ विश्वचषक इतिहासातील आणखी एक मोठा उलटफेर करण्याच्या खूपच जवळ होता. मात्र, एकाच फलंदाजाच्या सुटलेल्या दोन झेलांमुळे गणित बिघडलं. या फलंदाजाने एकट्याच्या जोरावर संघाला जबरदस्त विजय मिळवून दिला. कारण, त्या फलंदाजाने चक्क द्विशतक ठोकले. हा फलंदाज इतर कुणी नसून ग्लेन मॅक्सवेल होता. त्याने ऑस्ट्रेलिया संघाला एकट्याच्या जोरावर विजय मिळवून देऊन इतिहास घडवला. कारण, कोणत्याही फलंदाजाला आजपर्यंत सहाव्या क्रमांकावर खेळताना द्विशतक ठोकता आले नव्हते. एवढंच काय, तर आव्हानाचा पाठलाग करताना कुणीही वनडेत द्विशतक केले नाहीये. मात्र, मॅक्सवेलने हे केले.

काय म्हणाला शाहिदी?
दुसरीकडे, तोंडचा विजय निसटताच अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) याने संघाच्या पराभवामागील सर्वात मोठे कारण सांगितले. सामन्यानंतर शाहिदी म्हणाला, “खूपच निराशाजनक. क्रिकेट हा एक मजेशीर खेळ आहे. हे आमच्यासाठी अविश्वसनीय होते. आम्ही सामन्यात होतो, आमच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली आणि सुटलेल्या झेलांमुळे आम्हाला नुकसान झाले. यानंतर मॅक्सवेल थांबलाच नाही. त्याने प्रत्येक शॉट खेळला आणि मी त्यालाच श्रेय देवू शकतो.”

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याचा सोपा झेल मुजीब उर रहमान याने सोडला, तेव्हा तो 33 धावांवर खेळत होता. पुढे बोलताना कर्णधार म्हणाला, “मला वाटले की, सुटलेले झेल महत्त्वाचे होते, त्यानंतर मॅक्सवेल वास्तवात चांगले खेळला. आमच्या गोलंदाजांनी पूर्ण प्रयत्न केला, पण त्यांनी आम्हाला कोणतीही संधी दिली नाही. संघाचा अभिमान आहे, पण आज रात्री आम्ही निराश होऊ.”

शाहिदी असेही म्हणाला की, “आम्ही विचार केला नव्हता की, अशाप्रकारे सामना संपेल. मात्र, हा खेळाचा भाग आहे. हे क्रिकेट आहे. आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मजबूत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू. त्याला (इब्राहिम जादरान) स्वत:चा अभिमान असेल. मलाही अभिमान वाटतो की, तो विश्वचषकात शतक ठोकणारा पहिला अफगाणी खेळाडू आहे.”

इब्राहिम जादरान (Ibrahim Zadran) याने 143 चेंडूत नाबाद 129 धावांची शतकी खेळी केली होती. त्यात 3 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. मात्र, मॅक्सवेलने 128 चेंडूत खेळलेल्या 201 धावांच्या नाबाद द्विशतकी खेळीमुळे सर्व उद्ध्वस्त झाले. अफगाणी संघासाठी मुजीब उर रहमान व्हिलन ठरला. कारण, त्याने आधी झेल सोडला होता. तसेच, नंतर एकाच षटकात 22 धावा खर्च करत सामना संपला होता. (Captain hashmatullah shahidi claims i think the dropped catches were the key after that glenn maxwell played really well)

हेही वाचा-
विजयानंतर मॅक्सवेलविषयी कर्णधार कमिन्सची मन जिंकणारी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला तर वाटलं होतं…’
पायाला गोळे येऊनही मॅक्सवेलने ठोकली डबल सेंच्युरी, ऐतिहासिक विजयानंतर सांगितला आख्खा प्लॅन, म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---