अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असगर अफगाण हा दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे. अफगाणिस्तान संघात कर्णधार आणि मध्यफळीचा फलंदाज म्हणून खेळणाऱ्या असगरने गुरुवारी (१२ नोव्हेंबर) आपला साखरपुडा उरकून घेतला. महत्त्वाचे म्हणजे असगर आधीपासून विवाहित असून त्याला आपल्या पहिल्या पत्नीपासून पाच अपत्ये देखील आहेत.
ट्विटरवरुन दिली माहिती
अफगाणिस्तानमधील वरिष्ठ पत्रकार इब्राहिम मोहम्मद यांनी ट्विटरवर ट्विट करत; असगर अफगाणच्या साखरपुड्याविषयी माहिती दिली. इब्राहिम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार असगर अफगाणने दुसऱ्यांदा साखरपुडा केला आहे. त्याला आपल्या पहिल्या पत्नीपासून पाच अपत्ये आहेत. यापैकी एक मुलगा आहे. कर्णधाराला या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा.”
https://twitter.com/IbrahimReporter/status/1326593053294006274
अफगाणिस्तानचा सर्वात यशस्वी कर्णधार
असगर अफगाण हा अफगाणिस्तानचा आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार मानला जातो. अफगाणिस्तानच्या तिन्ही प्रकारातील क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार राहिलेल्या असगरने आत्तापर्यंत १११ एकदिवसीय, ६९ टी२० व ४ कसोटी सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यात, असगरच्या नावे १ शतक आणि १८ अर्धशतके आहेत. त्याचे एकमेव शतक भारताविरुद्ध २०१८ आशिया चषकादरम्यान आले होते.
विश्वचषकापूर्वी करण्यात आले होते कर्णधारपदावरून दूर
असगर अफगाणला २०१९ क्रिकेट विश्वचषकापूर्वी अचानकपणे संघाच्या कर्णधार पदावरून हटवण्यात आले होते. मात्र, विश्वचषकातील अफगाणिस्तानच्या खराब कामगिरीमुळे पुन्हा एकदा त्याला राष्ट्रीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले. तो सध्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचे नेतृत्व करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
AUS v IND – “मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट खेळाडू”, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने केले भारतीय क्रिकेटरचे कौतुक
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा खुलासा, विराट कोहलीचे दोन व्हर्जन आहेत, एक आक्रमक तर एक…
ट्रेंडिंग लेख –
…म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच!
…तेव्हा एमएस धोनीने केलेली ‘ती’ भविष्यवाणी रोहित शर्माने खरी करून दाखवली!






