---Advertisement---

टी20 वर्ल्डकपपूर्वी संघाला मोठा धक्का; विराट कोहलीशी वादात अडकलेला खेळाडू स्पर्धेतून बाहेर

On: शुक्रवार, जानेवारी 16, 2026 9:20 AM
---Advertisement---

टी20 वर्ल्डकप 2026 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून संघांचा उत्साह शिखरावर पोहोचला आहे. पण अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी वर्ल्डकपपूर्वी मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज नवीन उल हक दुखापतीमुळे 2026 च्या टी20 वर्ल्डकपमधून आणि आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे.

माहितीनुसार, नवीन उल हक याच्यावर या महिन्याच्या अखेरीस शस्त्रक्रिया होणार आहे. अफगाणिस्तानकडून तो शेवटचा खेळ डिसेंबर 2024 मध्ये खेळला होता, त्यानंतर खांद्याच्या दुखापतीमुळे तो 2025 चा आशिया कपही खेळू शकला नाही. दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनाला त्याच्या जागी कोणता खेळाडू मुख्य संघात आणायचा हे ठरवणे बाकी आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप नवीन उल हकच्या जागी कोणाला सामील केले जाईल याची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, राखीव खेळाडूंपैकी मिस्ट्री स्पिनर गझनफर, फलंदाज इजाज अहमदझाई आणि वेगवान गोलंदाज झिया उर रहमान शरीफी यांना मुख्य संघात संधी मिळू शकते.

2026 च्या T20 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानला गट D मध्ये स्थान देण्यात आले आहे. या गटात त्यांचा सामना न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, यूएई आणि कॅनडा यांच्याशी होणार आहे. अफगाणिस्तान संघ 8 फेब्रुवारी रोजी चेन्नईत न्यूझीलंडविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल.

अफगाणिस्तानचा संघ खालीलप्रमाणे – कर्णधार राशिद खान, उपकर्णधार इब्राहिम झादरान, विकेटकीपर रहमानुल्लाह गुरबाज, मोहम्मद इशाक, सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, शाहिदुल्लाह कमाल, अझमतुल्लाह उमरजई, गुलबदीन नैब, मोहम्मद नबी, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, अब्दुल्ला अहमदजई.

राखीव खेळाडू – एएम गझनफर, इजाज अहमदझाई, झिया उर रहमान शरीफी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---