गेल्या दोन महिन्यांपासून क्रिकेटविश्वात फक्त आणि फक्त अफगानिस्तानच्या खेळाडूंचीच चर्चा आहे.
रशिद खान आणि मुजिब उर रेहमान हे त्यांनी आपीयलमध्ये केलेल्या कामगिरीमुळे चर्चेत आहेत. रशिद आणि मुजिब बरोबर अफगानिस्तानच्या आणखी एका खेळाडूच्या चर्चेने जोर धरला आहे. तो त्याच्या कामगिरीमुळे नव्हे तर, त्याच्या धोनी प्रेमामुळे.
अफगानीस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद शहजादने आपला आदर्श मानणाऱ्या माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्धल यापूर्वी अनेकदा प्रेम व्यक्त केले आहे.
क्रिकबझ या संकेतस्थळाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका व्हीडीओमध्ये मोहम्मद शहजाद धोनाबद्दल भरभरून बोलला. यावेळी त्याने धोनीशी संबंधित एक किस्सा सांगितला.
तो म्हणाला, “वेस्टइंडीजमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात तिरंगी मालिकेचा अंतिम सामना चालू होता त्यावेळी रमझानचा महिना असल्यामुळे माझा रोजा होता. मला रोजा सोडायला 3-4 मिनिटे बाकी होती आणि भारताला जिंकायला शेवटच्या षटकात 15 धावांची गरज होती.
धोनी स्ट्राईवर असल्याने मला धोनीची बॅटिंग बघायची होती. धोनीची बॅटिंग पहाण्यासाठी मी तेव्हा माझा रोजा उशीरा सोडला होता.
त्यावेळी मी भारताच्या विजयासाठी अल्लाकडे प्रार्थना केली होती.”
अफगानिस्तानचा हा स्फोटक फलंदाज धोनीचा निस्सीम चाहचा आहे. त्याला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचे खूप कौतूक आहे. ज्यावेळी मोहम्मद शहजादला धोनीला भेटायची संधी मिळते त्यावेळी तो धोनीकडून क्रिकेटचे धडे घ्यायचे मात्र विसरत नाही.
महत्वाच्या बातम्या-
–टाॅप ५- कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंचपुर्वी शतकी खेळी करणारे खेळाडू
–न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटरने मोडला स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागचा विक्रम