वनडे विश्वचषक सुरू होण्याआधी मंगळवारी (3 सप्टेंबर) श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सराव सामना खेळला गेला. उभय संघांतील हा सामना अफगाणिस्तानने 6 विकेट्स राखून जिंकला. श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिस याने या सामन्यात 158 धावांची सर्वोत्तम खेळी केली. पण आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. दुसरीकडे अफगाणिस्तानच्या विजयात रहमनुल्लाह गुरबाझ आणि रहमत शाह यांची खेळी महत्वाची ठरली.
अफगाणिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या श्रीलंका संघाने 46.2 षटकांमध्ये 294 धावांची खेळी केली. कर्णधार कुसल मेंडिस (Kusal Mendis) याने 87 चेंडूत 158 धावांची खेळी केली. मेंडिसव्यतिरिक्त श्रीलंकेचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. प्रत्युत्तरात 257 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या रहमनुल्लाह गुरबाझ याने 92 चेंडूत 119 धावांची खेळी केली. तसेच तिसऱ्या क्रमांकावर खेळताना रहमत शाह यांने 82 चेंडूत 93 धावा केल्या. (Afghanistan won by six wickets against Sri Lanka in the warm-up game)
महत्वाच्या बातम्या –
कर्णधार बाबर खेळी व्यर्थ, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात पाकिस्तान पराभूत
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान पिकला हशा! खेळाडू एकमेकांकडेच पाहत असताना मधून गेला चौकार