fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आफ्रिदीने कामच असं केलं की भज्जीला कराव लागलं कौतूक

कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात हाहाकार माजवत आहे. त्यामुळे जगभरात या व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी अनेक प्रकारे मदतीचा हात पुढे येत आहे. अशामध्ये पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनेही या साथीच्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

आफ्रिदीच्या या चांगल्या पावलामुळे त्याची प्रशंसा करण्यात येत आहे. तसेच या प्रशंसकांमध्ये भारतीय संघाचा माजी स्टार फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंगचाही (Harbhajan Singh) समावेश आहे.

आफ्रिदीने (Shahid Afridi) मंगळवारी (२४ मार्च) पाकिस्तानमधील काही लोकांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप केले. यादरम्यानचे काही फोटो त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत.

यावेळी आफ्रिदीने ट्वीट केले की, “गरजू लोकांच्या (Help Needy Person) मदतीसाठी जंतुनाशक साबण, वस्तु, जेवणाचे वाटप केले. तसेच कोरोना व्हायरसपासून (Corona Virus) संरक्षण करण्यासाठी लोकांना मार्गदर्शक पत्रके देण्याचा आज तिसरा दिवस होता. लोकांना घरीच राहण्याचा सल्लाही दिला. प्रत्येकाने एकत्र काम करा आणि इतरांनाही मदत करा.”

आफ्रिदीच्या या पोस्टने हरभजन खूश झाला आणि त्याने या ट्वीटवर आफ्रिदीची प्रशंसाही केली. यावेळी हरभजनने ट्वीट केले की, “मानवतेसाठी सर्वात चांगले काम केले शाहिद. देवाची कृपा आपल्या सर्वांवर राहो. तुला अशीच कामगिरी करत राहण्यासाठी शक्ती मिळो. जगाच्या भल्यासाठी प्रार्थना करतो.”

हरभजनने आपली प्रशंसा केल्याबद्दल आफ्रिदीने त्याला धन्यवाद दिला आहे. यावेळी आफ्रिदी म्हणाला की, “मानवतेपेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नाही. यासाठी धन्यवाद भज्जी. यावेळी सध्या सर्व जगाने एकत्र येण्याची आवश्यकता आहे. गरीब लोकांची मदत करणे आपली सामूहिक जबाबदारी आहे. जेणेकरून कोविड-१९विरुद्ध लढता येईल.”

पाकिस्तानमध्ये आतापर्यंत १०००पेक्षा अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर ७ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणारे ५ गोलंदाज, पहिल्या स्थानावर आहे एक भारतीय

-कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळताना टिच्चून फलंदाजी करणारे ५ फलंदाज

-टीम इंडिया जिथं १२ सामने खेळली ते मैदान आता होणार कोरोना बाधितांसाठी आयसोलशन सेंटर

You might also like