पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम १० महिन्यांनंतर आपली मुलगी अयाला हिला भेटला. तेव्हा दोघांनीही एक साथ अत्यंत चांगला वेळ घालवला. यादरम्यान अक्रमने याबाबत एक सुंदर असा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
यावर अक्रमने लिहिले आहे की, “शेवटी १० महिन्यांनंतर माझ्या मुलीला भेटताना.” अक्रमने त्याची पत्नी शनिएरा, जी एक ऑस्ट्रेलियन सामाजिक कार्यकर्ती आहे, तिचेदेखील आभार मानले. यात त्याने लिहिले, “या लहान राजकुमारीची माझ्या अनुपस्थितीत एवढी चांगल्या पद्धतीने काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद.”
Finally seeing my daughter after 10 months apart! Thank you @iamshaniera for raising such a beautiful little princess while we have been apart #HappyDays #Australia pic.twitter.com/EbyCTOKzZp
— Wasim Akram (@wasimakramlive) September 4, 2021
अक्रमने ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट करताच खूप व्हायरल झाला. यामध्ये भारताचे समालोचक हर्षा भोगले यांनीदेखील अक्रमच्या या व्हिडिओवर प्रतिसाद दिला. ज्यामध्ये त्यांनी लिहिले, “एका भीतीदायक वेगवान गोलंदाजाच्या हातात एक प्रेमळ अशी परी”
Lovely. The softie residing in a scary fast bowler!
— Harsha Bhogle (@bhogleharsha) September 4, 2021
तसेच आणखी एका चाहत्याने लिहिले की, “सुंदर… हे पाहून मला खूप आनंद झाला. मला ही अशी भावना परिचयाची आहे. काही वर्षांपूर्वी मी कामावरून घरी आल्यावर माझी मुलगी देखील अशीच धावत यायची आणि मला मिठी मारायची. आता ती मोठी झाली आहे. जवळपास माझ्या उंचीची ती आता झाली आहे. काही महिन्यातच ती मला उंचीतही मागे टाकेल. मुली खरंच खूप खास असतात.” तर एकाने लिहिले आश्चर्यकारक आणि अद्भुत क्षण.
I am used to this feeling as well, as I come home from a hard day’s work and my daughter runs in to hug me tight. Daughters are father’s heartbeat after all❤️.
— Rohan Karkhanis▶️ (@RohanKarkhanis) September 4, 2021
कोविड-१९ च्या प्रवास निर्बंधामुळे अक्रम गेल्या १० महिन्यांपासून आपल्या कुटुंबापासून दूर होता. तो क्रिकेटसंबंधी काही कामासाठी पाकिस्तानमध्ये होता, तर त्याची पत्नी आणि मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये राहत होते. त्यानंतर मागील महिन्यात वसीम अक्रम ऑस्ट्रेलियामध्ये आला, मात्र येथे १४ दिवसांच्या कठोर विलीनीकरणाच्या प्रक्रियेला सामोरे गेल्यानंतर तो त्याच्या परिवारातील सदस्यांना भेटू शकला.
महत्त्वाच्या बातम्या –
–कोहलीने प्रथम श्रेणीत १०,००० धावांचा टप्पा तर पार केला, मात्र ‘या’ दिग्गजांना पछाडण्यात अपयशी ठरला
–पालघर एक्स्प्रेस नॉनस्टॉप!! इंग्लंडला चोप देत दोन्ही डावात झळकावले अर्धशतक, ‘मोठा’ विक्रम केला नावावर
–कर्णधाराचे खेळाडूंवरील प्रेम! रोहितच्या शतकानंतर विराटचा उत्साह होता पाहाण्यासारखा, व्हिडिओ व्हायरल