---Advertisement---

धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर शास्त्रींना नव्हता विश्वास, कॅप्टनकूलने ‘असे’ पाडले होते तोंडघशी

On: रविवार, सप्टेंबर 12, 2021 9:12 AM
---Advertisement---

आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने बुधवारी (८ सप्टेंबर) आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले. यातीलच एक म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघाचा मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून नियुक्त केले आहे. मात्र यानंतर लगेचच वादाला देखील सुरुवात झाली होती. यानंतर आता सोशल मीडियावर धोनीचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनी भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची चेष्टा करत आहे.

हा व्हिडिओ २००७ सालच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आहे. तेव्हा २००७ साली धोनीच्या नेतृत्वातपदात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला उपांत्यपूर्व फेरीत नमवले होते. ज्यानंतर सामन्याच्या पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये धोनीने शास्त्रींना चांगलेच घेरले होते. यामध्ये दिसते की, सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये धोनी शास्त्रींना म्हणत आहे की, “मी काल वृत्तपत्रातील तुमचा एक स्थंभ वाचला होता. ज्यामध्ये तुम्ही लिहिले होते की, हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जास्त संधी आहे. मात्र मी आणि माझ्या खेळाडूंनी तुम्हाला चुकीचे सिद्ध केले.”

यानंतर धोनी म्हणतो की, “मला विश्वास आहे की, भारतीय संघाच्या विजयाने तुम्ही आमच्याही पेक्षा जास्त खूश असाल.” भारताने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच हंगामात अंतिम सामन्यात पाकिस्तानला नमवत चषक आपल्या नावे केला होता. तेव्हा धोनीला या स्पर्धेसाठी नुकतेच भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले होते.

विशेष म्हणजे, भारतीय संघ २००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सचिन तेंडूलकरसह अनेक दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत उतरला होता. अशा परिस्थितीतही भारतीय संघाने उत्कृष्ट खेळी करत जेतेपद पटकावले होते. दरम्यान आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये खेळविण्यात येणार आहे. १७ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध २४ ऑक्टोबरला सुरू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर जेम्स अँडरसन घेणार निवृत्ती? गोलंदाजाने स्व:त सांगितले सत्य
ज्या देशाच्या दौऱ्यावर आतंकी हल्ल्यात लागली होती गोळी, आज त्याच देशात प्रशिक्षक बनून गेला ‘हा’ खेळाडू
अंतिम कसोटी रद्द होण्यासाठी आयपीएलला जबाबदार धरणाऱ्यांना इरफानचे खडेबोल; म्हणाला, ‘माझे दात पडले…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---