भारतीय फुटबॉल संघ आज (13 ऑक्टोबर) चीन विरुद्ध ऐतिहासिक मैत्रीपुर्ण सामना खेळणार आहे. तब्बल 21 वर्षांनंतर होणाऱ्या या मैत्रीपूर्व सामन्याला संध्याकाळी पाच वाजता सुरूवात होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टारवर होणार आहे.
तसेच भारतीय संघ प्रथमच चीनमध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. तर चीन नेहरू कपमुळे सात वेळा भारतीय मैदानावर खेळला आहे.
हे दोन्ही संघ याआधी 17 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये चीन 12 सामने जिंकत आघाडीवर आहे तर पाच सामने अनिर्णीत राहिले. तसेच शेवटी ते 1997ला नेहरू कपमध्ये समोरा-समोर आले होते. यावेळी चीनने भारताला 2-1 असे पराभूत केले होते.
भारतीय संघाचा कर्णधार स्टार डिफेंडर संदेश झिंगन असणार आहे हे भारतीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईनने पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच स्टार स्ट्रायकर सुनिल छेत्रीचाही या सामन्यात सहभाग असणार आहे.
शांघाईपासून 100 किमीवर असलेल्या सुझोऊत होणाऱ्या या सामन्याकडे दोन्ही देशाच्या चाहत्यांच लक्ष लागले आहे. तसेच भारतीय संघ एकही वेळा फिफा विश्वचषक खेळला नाही तर चीन 2002च्या विश्वचषकात साखळी फेरीतील तीनही सामन्यांत पराभूत होत बाहेर पडला होता.
जागतिक क्रमवारीत चीन 74व्या तर भारत 21 स्थानांनी खाली असे 97व्या स्थानावर आहे. तसेच चीन एशियन कपमध्ये 11वेळा खेळला आहे तर भारतीय संघ फक्त तीन वेळाच खेळला आहे.
फिफाच्या मैत्रीपूर्ण होणारा हा सामना दोन्ही संघासाठी जानेवारीत होणाऱ्या एएफसी एशियन कपची पूर्वतयारी सामना असणार आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या या एशियन कप स्पर्धेला 2019मध्ये जानेवारी महिन्यात सुरूवात होणार आहे.
“चीनमध्ये ही लढत होणार असल्यामुळे भारतीय संघाला चांगला अनुभव मिळेल. हा मित्रत्वाचा सामना आहे, पण भारतीयांनी झोकून देऊन खेळावे. याचे कारण आशियाई करंडकाच्या तयारीसाठी ही लढत होत आहे. भारतीय संघ चांगल्या स्थितीत आहे आणि कोणत्याही संघाविरुद्ध झुंजार खेळ करू शकतो. जमेच्या आणि कमकुवत बाजूंचा चांगला अंदाज घेण्याची संधी आपल्याला मिळाली आहे”, असे माजी भारतीय कर्णधार ज्यो पॉल अंचेरी म्हणाले.
तसेच नुकत्याच झालेल्या कतार विरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात चीनला 0-1 असा पराभव स्विकारावा लागला होता. तर भारतीय संघाचीही कामगिरी उंचावत चालली आहे. तर आजच्या होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–अशी कामगिरी करणारा लक्ष्य सेन ठरला दुसराच भारतीय
–कर्णधार विराट कोहलीचा आशिया खंडात मोठा पराक्रम; मिस्बा उल हकला टाकले मागे