पहिला दिवस पावसाचा खेळ पाहायला मिळाल्यानंतर अखेर शनिवारपासून (१९ जून, दुसरा दिवस) जागतिक कसोटी अजिंक्यपद सामन्याची सुरुवात झाली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे चालू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघ तिसऱ्या दिवसाखेर २ बाद १०१ धावा अशा स्थितीत आहे. तत्पुर्वी भारतीय संघाने पहिल्या डावात केवळ २१७ धावा केल्या आहेत. भारताकडून अष्टपैलू आर अश्विन हादेखील जास्त धावा करू शकला नाही. तो लवकरच तंबूत परतल्याचे पाहून त्याची पत्नी प्रिथी नारायणन हिने लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.
अश्विनला करता आल्या फक्त २२ धावा
भारताचा कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणेने तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली. परंतु काईल जेमिसनने अप्रतिम चेंडूवर विराटला माघारी धाडले. त्यानंतर भारताच्या फलंदाजांना जास्त वेळ मैदान तळ ठोकता आला नाही. पूर्ण भारतीय संघ २१७ धावांवर बाद झाला. दरम्यान भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू अश्विनने २२ धावांची जलद खेळी केली. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अश्विनने २७ चेंडूत २२ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार मारले.
अश्विनच्या पत्नीची प्रतिक्रिया
परंतु अश्विनला न्यूझीलंडच्या अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊथीने २२ धावांवरच पव्हेलिनयला पाठवले. यावेळी हॉटेलच्या बाल्कनीतून अश्विनची पत्नी प्रीथी नारायणन मैदानावरील सर्व दृश्य बघत होती. पती अश्विन लवकर बाद झाल्यानंतर तिने चकित होत ट्विटरवर ‘अय्यो’ अशी प्रतिक्रिया दिली.
https://twitter.com/prithinarayanan/status/1406579661908463623?s=20
काईल जेमिसनचा ‘पंच’
न्यूझीलंड संघाचा गोलंदाज काईल जेमिसनने भारतीय संघाविरुद्ध पहिल्या डावात ५ बळी घेतले. त्याने विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला बाद केले. भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंड संघाची धावसंख्या १०१/२ अशी आहे. भारतीय संघाकडून अश्विन आणि इशांत यांनी १-१ बळी घेतले आहेत
महत्वाच्या बातम्या
वयाची तिशी ओलांडूनही एका युवकाप्रमाणे न्यूझीलंडचा यष्टीरक्षक करतोय यष्टीरक्षण, एकदा बघाच
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आगामी काळात भारतात रंगू शकतात ‘या’ तीन मोठ्या आयसीसी स्पर्धा
लाईव्ह सामन्यात कर्णधार कोहली इशांतला म्हणाला, ‘काय रे, ओरडतोय की विचारतोय’