इंग्लंडचा उजव्या हाताचा फलंदाज ऍलेक्स हेल्सने (Alex Hales) पाकिस्तान सुपर लीग २०२२ (Pakistan Super League 2022) मधून माघार घेतली आहे. वैयक्तीक अडचण असल्याच सांगून त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. तो इस्लामाबाद युनायटेड संघाचा भाग होता. त्याने संघ सोडत असल्याची माहिती १५ फेब्रुवारीला दिली आहे. आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव (IPL 2022 mega auction) १२ आणि १३ फेब्रुवारीला पार पडला. या लिलावात त्याला कोलकत्ता नाइट रायडर्सने दीड कोटी रुपये देवून खरेदी केले आहे. आयपीएलमध्ये स्थान मिळाल्याच्या दोनच दिवसांनंतर त्याने पीएसएल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
इस्लामाबाद युनाइटेडने एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, सलामीवीर फलंदाज ऍलेक्स हेल्सने वैयक्तिक कारणांमुळे पाकिस्तान सुपर लीगमधून माघार घेतली आहे. आम्ही त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. तसेच पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीच्या हवाल्याने सांगितले की, हेल्सने बायो बबलमध्ये राहिल्याने होणाऱ्या मानसिक त्रासामुळे (बबल फटिग) माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अगोदर इंग्लंडच्या बेन डकेटनेही पीएसएल सोडली होती.
हेल्सचे पीएसएल सोडणे इस्लामाबाद युनायटेड संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हा संघ हेल्सवर खूप अवलंबून होता. हेल्सने सुद्धा संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. अलेक्स हेल्सने इस्लामाबाद संघासाठी या मोसमात ७ सामने खेळले आणि ४२.५० च्या सरासरीने २५५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन अर्धशतके झळकावली. या ३३ वर्षीय खेळाडूने गेल्या काही वर्षांत टी२० क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. २०१९ च्या विश्वचषकापूर्वी त्याला इंग्लंड क्रिकेट संघातून वगळण्यात आले होते. परंतु त्याने बिग बॅश लीग, सीपीएलसह अनेक वेगवेगळ्या टी२० संघांमध्ये चांगली कामगिरी केली.
हेल्सला यावेळी आयपीएलमध्येही संधी मिळाली आहे. केकेआरने त्याला खेळाडूला २०२२ च्या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी १.५ कोटी रुपयांच्या त्याच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे. हेल्सने आतापर्यंत ३३४ टी२० सामने खेळले असून ५ शतके आणि ५७ अर्धशतके करत त्याने ९७३१ धावा केल्या आहेत. नाबाद ११६ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
महत्वाच्या बातम्या-