---Advertisement---

संघातून वगळल्यामुळे अखेर पुजाराने नाराजी व्यक्त केलीच! म्हणाला, ‘प्रत्येक वेळी मला…’

On: मंगळवार, ऑगस्ट 22, 2023 4:01 PM
Cheteshwar Pujara
---Advertisement---

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने संघातून वगळल्यामुळे नाराजी व्यक्त केली. भारतीय संघाचा वेस्ट इंडीज दौरा नुकताच पार पडला. वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पुजाराला संघातून वगळण्यात आले होते. पुजारासाठी हा अनुभव नक्कीच चांगला नव्हता. सोमवारी (21 ऑगस्ट) अखेर पुजारा याविषयी बोलला.

चेतेश्वर पुजारा भारतीय संघाचा दिग्गज फळंदाज असून कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा हातखंडा आहे. त्याने 103 कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत 7195 धावा केल्या आहेत. असे असले तरी, पुजारावर अजूनही अनेकदा स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची वेळ येते. पुजारा जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामन्यात खेळला होता. पण या सामन्यात त्याला 14 आणि 27 धावांवर समाधान मानावे लागले. वेस्ट इंडीज दौऱ्यात संधी मिळाली नाही, म्हणून पुजारा नाराज दिसला.

नुकत्या एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत पुजारा म्हणाला, “मागच्या काही वर्षांमध्ये चढ-उतार पाहावे लागले आहेत. एक खेळाडू म्हणून या गोष्टी तुमची परिक्षा घेत आहेत. कारण 100 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळल्यानंतर आजही मला स्वतःला सिद्ध करावे लागते. हे एक वेगळेच आव्हान आहे. कधी-कधी या सर्व गोष्टींमुळे निराशा येते की, संघात स्थान मिळवण्यासाठी मी पात्र असल्याचे आजही सिद्ध करावे लागते. काही वेळा या गोष्टी तुमच्या अहंकाराशी खेळतात. स्वतःवर शंका उपस्थित होते की, खरोखर आपण यासाठी पात्र आहोत का? जर वारंवार ही गोष्ट सिद्ध करावी लागत असेल, तर तुम्ही विचार करता की, खरंच हे करणे गरजेचं आहे.”

पुजाराने पुढे एक रोमांचक आकडेवारीही सांगितली, जी काही काळापूर्वी त्याला कोणीतरी सांगितली होती. तो म्हणाला, “भारतासाठी मी दिलेल योगदान पाहता येणाऱ्या काळातही मी खूपकाही करू शकतो. काही काळापूर्वी मला एक आकडेवारी सांगितली गेली होती. थ्यानुसार मी भारतीय संघासाठी 70 ते 80 धावा केल्या, तर जवळपास 80 टक्के वेळा भारतीय संघ जिंकला आहे किंवा आम्ही तो कसीट सामना गमावला आहे.” दरम्यान, पुजारा जरी कसोटी संघातून बाहेर असला, तर सध्या तो इंग्लंडमध्ये वनडे कप खेळत आहे. त्याने ससेक्ससाठी नॉर्थएम्पटनशायर संघाविरुद्ध 106, तर समरसेट संघाविरुद्ध 117 धावा कुटल्या आहेत. (After being excluded from the team, Pujara finally expressed his displeasure! Said, ‘Every time I…’)

महत्वाच्या बातम्या –
विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन वेळी बिश्नोईला का आठवला शाहरुख खान? रिंकूशी झालेल्या चर्चेत केला खुलासा
लॉर्ड्स कसोटीत स्मिथला झालेली गंभीर दुखापत, तरीही खेळली संपूर्ण ऍशेस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---