आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात ५१ व्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स याच्यात संघर्ष झाला. या सामन्यात मुंबईने राजस्थानवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीला मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली आणि २० षटकात राजस्थान रॉयल्सलच्या ९ विकेट्स घेत अवघ्या ९० धावांवर रोखले. प्रत्युत्तरात मुंबईने केवळ ८.२ षटकांमध्ये आणि दोन विकेट्सच्या नुकसानावर सामन्यात विजय मिळवला. राजस्थानच्या पराभवानंतर संघाचा निर्देशक कुमार संघकारा नाराज झालेला दिसला आहे. त्याने या पराभवासाठी स्वत:च्या संघाला दोषी ठरवले आहे.
सामन्यानंतर संगकाराला विचारण्यात आले की, नाणेफेक हरल्यामुळे सामन्यावर त्याचा परिणाम झाला का? यावर संगकाराने उत्तर देताना सांगितले की, “तुम्ही असे म्हणू शकता की, आम्ही येते शारजाहवर खेळलो नव्हतो. अन्य सामने पाहिल्यानंतर असे वाटत होते की, आज ही खेळपट्टी थोडी चांगली आहे आणि शक्यतो यात थोडा वेग आहे. पण जेव्हा तुम्हाला फक्त ९० धावांचे रक्षण करायचे असते तेव्हा हे अवघड असते. हे तेव्हाच शक्य होते, जेव्हा तुम्ही पावरप्लेमध्ये खूप कमी धावा देऊन काही विकेट्सही घेता.”
खेळपट्टी आणि नाणेफेकच्या तुलनेत संघाची चूक जास्त
संगकारा पुढे बोलताना म्हणाला की, “आमच्यासाठी तो महत्वाचा क्षण होता, जेव्हा आम्ही पावरप्लेमध्ये ४१ धावा केल्या होत्या. आमची योजना १३ ते १४ षटकांपर्यंत अशाच धावा करण्याची होती. आमच्याकडे ७ विकेट्स शिल्लक होत्या आणि आम्ही एक किंवा दोन गोलंदाजांना लक्ष्य करून १५ षटकांनंतरसाठी मंच तयार करू शकत होतो. दुर्दैवाने आम्ही परिस्थितीनुसार खेळू शकलो नाहीत आणि मुंबईने अप्रतिम गोलंदाजी केली. आम्ही सतत विकेट्स गमावत होतो, म्हणून कोणत्याच टप्प्यावर आम्ही वर्चस्व करून खेळू शकलो नाही. त्यामुळे खेळपट्टी किंवा नाणेफेकच्या तुलनेत आमची चूक जास्त होती.”
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात शारजाहच्या खेळपट्टीवर फलंदाजांसाठी अडचण निर्माण होत आहे. यामुळे संघांना जास्त धावा करता आलेल्या नाहीत. याबाबत संगकारा म्हटला की, “अशाप्रकारची खेळपट्टी आव्हानात्मक असते आणि त्याच्यासोबत चांगल्या प्रकारे ताळमेळ बसवणे महत्वाचे असते. आम्ही सामन्याची आधीच शारजाहच्या खेळपट्टीविषयी चर्चा केली होती की, फलंदाजांना काय करायचे आहे आणि गोलंदाजांना काय करण्याची गरज आहे.”
दरम्यान, सामन्यात मुंबईच्या नाथन कूल्टर नाईल आणि जिम्मी निशम या दोन गोलंदाजांनी प्रत्येकी ४-३ विकेट्स घेतत्या आणि दिल्लीला केवळ ९० धावा करू दिल्या. तसेच मागच्या दोन सामन्यामध्ये संघातून बाहेर राहिलेल्या ईशान किशननेही अवघ्या २५ चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी केली आणि फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. त्याच्या खेळीच्या जोरावार मुंबईने सामन्यात ७० चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
चेहरा ओळखीचा दिसतोय ना? आयपीएलमध्ये ग्लॅमरचा तडका लावणारी ‘तान्या पुरोहित’, अनुष्काशी आहे खास नाते
टी२० विश्वचषक तोंडावर, पण त्याआधीचे सराव सामनेही महत्त्वाचे, वेळापत्रक झालंय घोषित; टाका नजर