भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता तो कोरोनामधून तो पूर्णपणे बरा झाला आहे. त्याच बरोबर तो श्रीलंका देशातून भारतामध्ये परत आला आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेल्यावर तेथे पंड्याला कोरोनाची लागण झाली होती.
त्याच बरोबर इतर अनेक क्रिकेटपटू जे त्याच्या संपर्कात आले होते, त्यांनाही कोरोनाचा धोका लक्षात घेता विलागिकरणात ठेवण्यात आले होते.
बीडीक्रिकटाइमच्या वृत्तानुसार, कृणाल आता त्याच्या घरी परतला आहे. श्रीलंकेत तो विलगीकरणात असल्याने तो भारतीय संघासह घरी परतला नव्हता. पहिल्या टी २० सामन्यानंतर ही घटना घडली आहे. भारताने टी २० मालिकेतील पहिला सामना जिंकला होता आणि श्रीलंका संघाला मालिकेत पराभूत करण्यासाठी भारतीय संघ सक्षम दिसत होता. मात्र, हे शक्य झाले नाही. कृणालचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या इतर अनेक खेळाडूंनाही विलगीकरणत ठेवण्यात आले.
भारतीय संघाने हे पाऊल खबरदारी म्हणून उचलले होते. परंतु यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की भारताकडे फक्त पाच आघाडीचे फलंदाज शिल्लक राहिले होते. नंतर टी २० मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, लेग स्पिनर युझवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम यांच्या चाचणीचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. नंतर या दोघांनाही श्रीलंकेत विलगिकरणात ठेवण्यात आले. या दोघांशिवाय पृथ्वी शॉ, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या हे देखील विलगीकरणात होते.
युझवेंद्र चहल आणि कृष्णाप्पा गौतम अजूनही श्रीलंकेत आहेत आणि आरटी-पीसीआर चाचणीच्या निगेटिव्ह रिपोर्टची वाट पाहत आहेत. काही वृत्तांनुसार, अष्टपैलू कृणाल पांड्या ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्या माउंट लविनिया हॉटेलमधून तो बुधवारी बाहेर पडला आणि भारतासाठी फ्लाईट पकडण्यासाठी गेला.
चहल आणि गौतम यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही खेळाडूंना गुरुवारी आरटी-पीसीआर चाचणी करावी लागली आहे. त्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह राहिला तरच त्यांना भारतात परतण्याची परवानगी दिली जाणार आहे .
महत्त्वाच्या बातम्या-
–बटलर बाद होण्यापूर्वी विराटने केली होती भविष्यवाणी; पुढील चेंडूवरच झाला असा गेम, पाहा व्हिडिओ
अँडरसन पडला विराटला भारी! भारतीय कर्णधार ‘गोल्डन डक’वर परतला माघारी, पाहा व्हिडिओ