बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंड कसोटी संघाने नुकतीच पाकिस्तानमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये जयमान पाकिस्तान संघ पराभूत झाला. मात्र, मायदेशात मोठ्या काळानंतर इंग्लंड संघ आल्यामुळे प्रेक्षकांमध्येही सामना पाहण्यासाठी चढाओढ पाहायला मिळाली. उभय संघांतील या मालिकेला मिळालेला प्रतिसाद पाहून आयसीसीकडून इतर संघांनी पाकिस्तानचा दौरा करावा, अशी अपील केली गेली आहे.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्याती तीन कसोटी सामने अनुक्रमे रावलपिंडी, मुल्तान आणि कराची शहरांमदअये खेळले गेले. इंग्लंडने या तिन्ही सामन्यांमध्ये मोठ्या अंतराने विजय मिळवला आणि यजमानांना क्लीन स्वीप (0-3) केले. या तिन्ही सामन्यांचा आनंद घेण्यासाठी स्टेडियममध्ये प्रक्षकांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती रावली होती. इंग्लंडच्या आधी यावर्षी ऑस्ट्रेलियन संघाने देखील पाकिस्तानचा दौरा केला होता. कसोटी म्हणजे क्रिकेटचा सर्वात मोठा फॉरमॅट आहे. असात हा सामना पाहण्यासाठी मैदानात प्रेक्षकांची संख्या देखील मर्यादित असते. मात्र, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यांमध्ये चित्र काहीसे वेगळे पाहायला मिळाले.
उभय संघांतील सामने पाहण्यासाठी प्रेशक्षकांनी लावलेली उपस्थितीमुळे आयसीसीचे सीईओ ज्योफ एलार्डिस (Geoff Allardice) देखील भारावले आहेत. एलार्डिस म्हणाले की, “पाकिस्तानमधील चाहते या खेळाविषयी आणि स्वतःच्या संघाविषयी खूप उत्सुक आहेत. पण सर्वात महत्वाची बाब हीच आहे की, ते पाहुण्या संघाचे स्वागत करतात.”
“पाकिस्तान आयसीसी महत्वाचा सदस्य आहे. अशा प्रकारच्या मालिका होत आहे आणि चाहते पाकिस्तानात उपस्थित राहत आहेत. काही दिवसांनी न्यूझीलंडसोबतची मालिका याठिकाणी खेळली जाणार आहे. या सर्व गोष्टी पाकिस्तानमध्ये नियमित स्वरुपात क्रिकेटची पुन्हा सुरुवात होण्यासाठी महत्वाच्या ठरतील,” असेही एलार्डिस पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, इंग्लंडनंतर पाकिस्तान संघाला मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. उभय संघांतील ही कसोटी मालिका 26 डिसेंबर रोजी सुरू होईल. मालिकेतील पहिला सामना कराचीमध्ये खेळला जाईल. (After England, other teams should tour Pakistan, ICC reacts)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर आझमच्या भावानेच केली त्याची कानउघडणी; म्हणाला, ‘इंग्लंडने तुमचं पितळं उघडं…’
लाजीरवाणे! पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मायदेशात परतले, बोर्डाने नाही दिला आठ महिन्यांचा पगार